उपअधीक्षक, पोलिस निरीक्षकांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन

 उपअधीक्षक, पोलिस निरीक्षकांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन 



 आष्टी ( शरद रेडेकर ) - कडा - आष्टी पोलिस ठाण्याच्या वतीने  सर्व नागरिकांना  सूचित करण्यात येते की, सध्याच्या कालावधीत चोरी व घरफोडीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले असल्याने  आपण आपल्याकडील सर्व मौल्यवान वस्तू, सोन्याचांदीचे दागदागिने तसेच रोख रक्कम स्वतःच्या जवळ न ठेवता बँकेत सुरक्षित ठेवावी.

       त्याचबरोबर सध्या गावात व शेतात वस्तीवर  राहणारे शेतकरी शेतीच्या कामासाठी घराला लॉक लावून शेतात जातात त्यामुळे दिवसाही चोऱ्या होतात, म्हणून शेतीच्या कामासाठी घरातील सर्व व्यक्तीं न  जाता घरातील एक व्यक्ति आपल्या घरी ठेवावी जेणेकरून आपल्या घराचे व मालमत्तेचे रक्षण होईल आणि चोरी व घरफोडीचे प्रकार होणार नाहीत तसेच आपल्या घराच्या परिसरात गावात कोणीही संशयित अथवा अनोळखी इसम आढळून आल्यास तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, आष्टी पोलिसांशी संपर्क साधावा व  मालमत्तेचे रक्षण करावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे  असे  अहवान आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर