MSCB विरोधात गायकवाड जळगाव येथील शेतकरी संतप्त...
शेवगाव प्रतिनिधी हरिभाऊ केसभट
गायकवाड जळगाव येथील शेतकरी आज MSCB बालमटाकळी उप. केंद्र शेवगाव यांच्या विरोधात संतप्त झाले. गेले पंधरा दिवसापासून शेतीपंपाची लाईट सुरळीत चालत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया चालले.यावेळी शेतकऱ्यांनी महावितरण चे मा. मेहता साहेब व लाईनमन डमाल यांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
या वेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लाइट सुरू करण्याची विनंती केली यावेळी बोलताना MSCB चे अधिकारी यांनी आजच्या आज लाईट सुरळीत सुरू करू असे आश्वासन दिले.
गायकवाड जळगाव येथील ग्रामस्थांनी निवेदनामध्ये 4 एप्रिल 2022 पर्यंत लाईट सुरळीत सुरू नाही झाली तर 4 एप्रिल रोजी आंदोलन सुकळी फाटा येथे बैलगाडी व सर्व शेतकरी मिळून रस्ता रोको आंदोलन करणार असे निवेदनामध्ये म्हटले.
निवेदन देताना गायकवाड जळगाव येथील असंख्य शेतकरी उपस्थित होते यावेळी श्री हरिभाऊ केसभट शिवबा संघटना जिल्हा अध्यक्ष अहमदनगर, विकास केसभट, अजित सुरोशे सरपंच, रमेशराव केसभट, अशोक केसभट, विजय हुगे, कृष्णा केसभट, गणेश केसभट, रामदास केसभट, अजित केसभट, संतोष केसभट, रमेश सुरवसे, राम केसभट, गोविंद केसभट तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
{शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक एका पाण्याने जाऊ नये म्हणून MSCB च्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन शेतकर्यांची लाईट सुरळीत करावी ही विनंती अन्यथा शिवबा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल......
श्री हरिभाऊ केसभट पाटील शिवबा संघटना जिल्हा अध्यक्ष अहमदनगर}
stay connected