सोनिजवळा जि. प. शाळेची शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड ! ------------------------------------ अध्यक्ष पदी दशरथ चवरे तर उपाध्यक्ष पदी वैजनाथ गायकवाड यांची निवड.

 सोनिजवळा जि. प. शाळेची शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड !

------------------------------------

अध्यक्ष पदी दशरथ चवरे तर उपाध्यक्ष पदी वैजनाथ गायकवाड यांची निवड.

===================


केज (प्रतिनिधी) दि १ रोजी

केज तालुक्यातील सोनिजवळा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालयाची शालेय शिक्षण समिती ची बिनविरोध निवड करण्यात आली .अध्यक्ष पदी दशरथ चवरे तर उपाध्यक्ष पदी वैजनाथ गायकवाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली 


या बाबत सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील सोनिजवळा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय सोनिजवळा येथील  शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन शालेय व्यवस्थापन समिती ची निवड करण्यात आली शालेय शिक्षण समिती च्या अध्यक्ष पदी दशरथ चवरे तर उपाध्यक्ष पदी वैजनाथ गायकवाड तर सदस्य पदी मनोहर गिरी,सौ, शोभा भांडवलक ,हनुमंत वैरागे, नितीन क्षीरसागर, शबानाबी शेख, सौ सोनाली करपे, अकबर शेख, सौ जयश्री ससाणे, सौ मिनाक्षी कोकाटे, राजेश भांडवलकर, गणेश ससाणे, बाळासाहेब भांडवलकर, ग्रामपंचायत सदस्य मालनबी शेख, शिक्षण तज्ञ अँड सचिन गिरी, शिक्षक प्रतिनिधी नवले मँडम, विध्यार्थी प्रतिनिधी महेश शिंदे, विध्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी गायकवाड तर सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर या प्रसंगी केंद्र प्रमुख बालासाहेब चाटे सर, यांची विषेश उपस्थिती होती तसेच सोनिजवळा येथील सरपंच मुकुंद गायकवाड, मिनाज पठाण सर, उपसरपंच बाळासाहेब कोकाटे  , सेवा सहकारी सोसायटी चे नवनिर्वाचित  चेअरमन सोपन ससाणे, दादासाहेब ससाणे, आरुण करपे ,

अध्यक्ष म्हणून दशरथ चवरे तर उपाध्यक्ष म्हणून वैजनाथ गायकवाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली, अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सदस्य, माजी अध्यक्ष यांचा शाळेच्या वतिने शाल हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक राऊत सर यांनी सर्वाचे आभार मानले यावेळी विध्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी नागरीक 

मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.