*🔆 गौरव नारी शक्तीचा 🔆*
*स्वाभिमान असे नाभिक समाजाचा*
*अभिमान आमच्या ताईचा*
✒️शब्दांकन : संजय पंडित
संगमनेर शहरातील ज्येष्ठ समाज कार्यकर्त्या आणि आपल्या समाज भगिनी श्वेता भागवत यांना नुकताच "सन्मान स्त्री शक्तीचा" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आजवरच्या त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन अहमदनगर येथील साई संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या या पुरस्कारासोबत सन्मान पत्र व तुळशी वृंदावन देऊन समाज कार्यकर्त्या श्वेता भागवत यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी त्यांचे कुटुंबीय सासू,आई आणि पती भारत भागवत उपस्थित होते.
परिवार आणि पती भारत भागवत यांच्या सहकार्यामुळेच आणि खंबीर पाठिंब्यामुळेच हा सन्मान होत असल्याचे श्वेता भागवत यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते हा सन्मानाचा पुरस्कार देण्यात आला.
श्वेता भरत भागवत या संगमनेर येथील आपल्या नाभिक समाजाच्या कार्यकर्त्या असून गेली दहा ते बारा वर्ष त्या समाजकार्यात विविध मार्गांनी आपले योगदान देत आहेत.त्या उच्य शिक्षित असून संगमनेर मधील बारामती सहकारी बँकेत रोखपाल या पदावर कार्यरत आहेत.
गेली दहा वर्ष त्या जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रमात सहभागी असून संगमनेर भागात या मंच द्वारे जवळ जवळ दोन हजार महिला बचत गट चालवले जातात.या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना बँकेचे व्यवहार,विविध कर्जांची माहिती,शासकीय योजनांची माहिती देऊन जागृती वाढवली आहे.
महिलांमध्ये विविध विषयांची जागृती,आरोग्याविषयी शिबिरे,मेळावे,स्वयंरोजगार,आणि महिला सक्षमीकरण या सारखे महत्वाचे कार्यक्रम त्यांनी आजवर राबविले आहेत.
संगमनेर तालुक्याच्या नगरअध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखालीही त्यांनी महिलांचे विविध उपक्रम राबवून समाजातील महिलांना वेगवेगळ्या प्रकारे मदत आणि मार्गदर्शन केले आहे.
महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रत्येकवर्षी सहली,आणि अभ्यास दौरे आयोजित करून त्यांनी महिलांना वेगवेगळ्या विषयांचे सखोल मार्गदर्शन केले आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सुध्धा त्यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन,विम्याचे महत्व पटवून दिले.यामुळे अनेक महिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना काळात उपचार खर्चात दिलासा मिळाला.
याच आणि अशा अनेक समाजकार्याची दखल घेऊन अहमदनगर मधील साई संघर्ष प्रतिष्ठानने श्वेता भागवत यांना यंदाचा "सन्मान स्त्री शक्तीचा" हा पुरस्कार देऊन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सन्मानित केले आहे.
श्वेता भागवत यांच्या या सन्मानाने नाभिक समाजाच्या शिरमुकुटात सन्मानाचा तुरा रोवला गेला आहे,
सकल समाजाची मान अभिमानाने उंचावली आहे.
त्यांच्या या अफाट समाज कार्याचे कौतुक संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात होत असून विविध मान्यवर आणि सेवाभावी संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्वेताताई भागवत यांचे आजवरचे समाजकार्य समाजातील महिला कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असून घर,नोकरी सांभाळून त्यांनी केलेले कार्य समस्त महिला वर्गाला स्फूर्ती देणारे आहे.
stay connected