*बेरोजगारी, इंधन दरवाढ, महागाई ला कारणीभूत असलेल्या केंद्र सरकार च्या विरोधात युवासेनेचा थाळी नाद*
कडा /प्रतिनिधी.....
आष्टी तालुक्यातील कडा येथे युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशावर युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई, बीड जिल्हा संपर्क प्रमुख अंकितजी प्रभू तसेच युवासेना जिल्हा प्रमुख सागर बहिर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना आष्टी तालुका अध्यक्ष सागर खेडकर तसेच युवासेना आष्टी तालुका समन्वयक दिपक डहाळे यांच्या यांच्या नेतृत्वाने आज हे आंदोलन दिनांक 3 एप्रिल रोजी आष्टी तालुका युवासेनेच्या वतीने सकाळी ठीक 10 वाजता आज मार्केट यार्ड कडा बाजार या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात थाळी नाद आंदोलन करण्यात आले .यावेळी आंदोलनात तालुक्यातील तसेच कडा शहरांमधील युवासेना शिवसेना उपस्थित सुधीर ढोबळे,किरण देसाई, अंबादास ढोबळे,नवनाथ ढोबळे, कुमार देशमुख,नागेश खोटे, खंडू ढवळे, रवी कर्डिले, विकी कर्डील आदी उपस्थित तसेच युवाशिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected