"येडेश्वरी शुगर कारखाना सारणी( आ) च्या आसवानी (डिस्टिलरी) 60KLPD,प्रकल्पाचे ८, एप्रिल रोजी उद्घघाटन.
'
----------------------------------------
"महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घघाटन.
===================
केज!प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांतीची मुहुर्त मेढ रोवणाऱ्या येडेश्वरी शुगर कारखाना सारणी( आ) च्या आसवाणी( डिस्टीलरी) विस्तारीत 60kLPD, प्रकल्पाचे उद्घघाटन दि,८, एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी ठिक १०-००, वाजता होणार आहे,
सदरील कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते, जलसंपदामंत्री मा.ना. श्री. जयंतरावजी पाटिल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ,पालकमंत्री बीड जिल्हा मा.ना. श्री.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या विशेष उपस्थितित होणार असून या कार्यक्रमाला मा.ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, अध्यक्ष आखिल भारतीय वारकरी मंडळ, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे तरी केज तालुक्यातील ,पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी ८, एप्रिल, शुक्रवार रोजी, येडेश्वरी साखर कारखाना पवनसुतनगर, आनंदगाव( सा)ता. केज. जि. बिड. येथे उपस्थित रहावे असे आवाहन येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. बजरंग( बप्पा) सोनवणे यांनी केले आहे.
stay connected