*अजितदादा सत्तेत असले की हमखास लोडशेडींग होतेच - सलीम जहाँगीर*
*भाजपच्या पाच वर्षांच्या काळात एकही दिवस लोडशेडींग नव्हती*
बीड ( प्रतिनिधी ) राज्यात गेल्या पाच वर्षात भाजपचे सरकार असताना एकही दिवस लोडशेडिंग नव्हती. कारण भाजप सरकार हे शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हिताचे होते. मात्र मागील पंधरा वर्षाचा इतिहास आठवा ज्या ज्यावेळी अजितदादा पवार सत्तेत असतात, त्या त्यावेळी राज्यात लोडशेडींग अटळ असतेच. लोकांनो इतिहास आठवा, यापूर्वी ते ऊर्जामंत्री आणि आता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आहेत. यावेळीही त्यांच्या सरकारने राज्याला लोडशेडींगच्या खाईत लोटले आहे. जनतेसाठी हा प्रचंड मानसिक त्रास असून येणाऱ्या निवडणुकीत जनता त्याचा हिशोब अजितदादा आणि महाविकास आघाडी सरकारला दाखवून देईल असा ईशारा भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी दिला आहे.
राज्यात सध्या सण उत्सवाचे दिवस आहेत. राम नवमी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , महात्मा फुले जयंती , रमजान ईद हे सर्वधर्मीय जनतेचा सण उत्सव आहे. कडक उन्हाळा असून उष्णतेने जनता त्रस्त आहे. प्रचंड उकाडा वाढलेला असतांना राज्य सरकारने बीडसह राज्यात लोडशेडींग सुरू केली आहे. आठ ते नऊ तास लोडशेडींग केली जात आहे. शेतकऱ्यांना आधीच पूर्णवेळ वीज दिली जात नाही. शेतपिकांना पाणी देण्यासाठी रात्र रात्र जागून शेतकरी पिकांना पाणी देत होता. त्यातच आता लोडशेडींग करण्यात येत असल्याने पाणी असूनही पिके जळून जात आहेत. उकाडा आणि उष्मा प्रचंड वाढला आहे. वीज पुरवठा आणि वीज उत्पादनाचे नियोजन करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले असून त्याचे खापर लोडशेडींग करून राज्यातील सर्वसामान्य जनतेवर फोडले जात आहे. लोडशेडींगमुळे उष्माघाताने राज्यात एखादा बळी गेल्यास त्यास आर्थमंत्री आजितदादा पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत हेच जबाबदार असतील असेही भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.
stay connected