शिवसेना नेते यशवंत जाधव यांना मोठा धक्का...! आयकर विभागाने ४० मालमत्ता केल्या जप्त....?

 शिवसेना नेते यशवंत जाधव यांना मोठा धक्का...!

आयकर विभागाने ४० मालमत्ता केल्या जप्त....?



प्रतिनिधी : संजय पंडित


दि.८ मुंबई : मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई केल्याचे समजते. यशवंत जाधव यांच्या जवळपास ४० मालमत्ता आयकर विभागाने मर्यादित काळासाठी जप्त केल्याची माहिती आहे. तसेच, वांद्रे येथील जाधव यांचा सुमारे पाच कोटी रुपये किमतीचा एक फ्लॅटही आयकरने जप्त केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. भायखळा येथील सुमारे २६ फ्लॅट्स जप्त करण्यात आले असून हे फ्लॅटही जाधव यांचेच असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात जाधव यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेली मालमत्ताही जप्त केल्याची चर्चा आहे.

सांगितले जात आहे की, यशवंत जाधव हे आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातूनही संपत्ती संचय करत असत. त्यामुळे त्यांच्या काही नातेवाईकांनाही ईडीने नोटीस पाठवल्याचे समजते.विनित जाधव हे यशवंत जाधव यांचे यांचे पुतणे आणि मोहिते नावाचे आणखी एक नातेवाईक यांनाही आयकरने समन्स पाठवले आहे. 


यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या एका डायरीत काही नावे कोडवर्डमध्ये आढळून आली आहेत. यापैकी काही नावे 'मातोश्री', ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ अशा प्रकारची आहेत. या काही नावांसोबत कोट्यवधी तर काहींसोबत लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जाधव कुटुंबीय चर्चेत आले असतानाच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशी कारवाई होणे हा शिवसेनेसाठी धक्का मानला जातो आहे.


दरम्यान यशवंत जाधव यांच्या मालमत्ता आणि किंमत पुढील प्रमाणे आहे..

वॉटर फील्ड, क्रॉस रोड IV, वांद्रे

वाडी बंदर, माझगाव – ५ कोटी १० लाख रुपये

व्हिक्टोरिया गार्डन – २ कोटी १० लाख रुपये


यशवंत जाधवांच्या डायरीत नेमकं  आणखी काय होतं?

यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एक डायरी मिळाली होती. यात त्यांच्या व्यवहारांची पोलखोल झाली होती. त्यात निवासी इमारतीतील भाडेकरु हक्क संपादन करण्यासाठी सुमारे १० कोटी रोख दिले, गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला २ कोटींचे पेमेंट केले, ‘मातोश्री’ला ५० लाखांचे घड्याळ पाठवले, असे उल्लेख होते. याबाबत आयकर विभागाने जाधवांकडे चौकशी केली असता त्यांनी डायरीतील ‘मातोश्री’ म्हणजे आपली आई असल्याचे सांगितले होते. आपल्याला दानाची २ कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. याचा वापर आपण हिंदू नववर्ष – गुढीपाडव्याच्या दिवशी भेटवस्तू देण्यासाठी केला. माझ्या आईच्या नावावर घड्याळांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला होता, पण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाचे नावही ‘मातोश्री’ असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यशवंत जाधव यांनी न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून भायखळ्यातल्या बिलखाडी चेंबर्समध्ये ३१ फ्लॅट खेरदी केल्याचा आरोप केला जात आहे. इमारतीच्या चार ते पाच भाडेकरूंना ३० ते ३५ लाख रुपये दिल्याचा बोललं जातं. हवालाच्या माध्यमातून हे पैसे दिल्याचा संशय आहे. त्याचवेळी आयकर विभागाने इतर ४० मालमत्तांचा तपास सुरु करत अखेर जप्तीची कारवाई केली आहे.


गेल्या महिन्यात यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर चार दिवस त्यांची चौकशी सुरु होती. जाधव आणि त्यांची पत्नी – भायखळ्याच्या शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.