येत्या १० वर्षात श्रीलंके सारखी परिस्थिति भारतात ही होऊ शकते ?--हिराशेट बलदोटा
संदिप जाधव/आष्टी
रोज वाढणाऱ्या पेट्रोल - डिजेल च्या किमती मुळे भारतात सामान्य जनता मेटाकुटीला आली असुन भारताचा विचार केल्यास नौकर्या बाबत , रोजनदारी बाबत , व्यापारा बाबात , कारखाना बाबत, उद्योगा बाबत भारता मध्ये सुधा परिस्थिति भयानक असुन सध्या ५ % लोकांना देखिल नौकर्या नाहीत। व्यापारांची परिस्थिति सुधा भयानक असुन कर्जाचे हफ्ते देखिल बैंकांना परत जात नाहीत। सामान्य माणुस फुकट च्या मिळणाऱ्या धान्या मुळे काम करण्यास तयार नाही। बँकांची सुधा परिस्थिति कागदो पत्री चांगली असुन त्या वर सुधा लोकांचा भरोसा नाही। कारखानदारी व उद्योग धंदे यांची परिस्थिति सुधा या वून वेगळी नाही। काही राजकीय लोकांकडे भरमसाठ पैसा - संपति आहे परंतु व्यापाऱ्यांना , कारखानदारांना , उद्योग धंद्यांना सरकार च्या इंकम टैक्स च्या नियमामुळे ह्या लोकांना जो त्रास होतो त्याची चर्चा न केलेलीच बरी। सरकार चे राजकीय लोकांचे रोजगार वाढी कडे लक्ष नाही। जे मूलभूत प्रश्न आहेत त्या कडे कोत्याच राजकीय पक्षांचे लक्ष नाही। त्यामुळे श्रीलंकेत जशे आर्थिक संकट उभे राहिले माहागाई मुळे तेथे पेट्रोल २५५ रु लीटर , डिजेल १७६ रु लीटर , तांदूळ ५०० रु किलो , गॅस टाकी ४१०० रु , ब्रेड पुडा १९०० रु आशी भयावह परिस्थिति श्रीलंकेत आहे। आशीच परिस्थिति भारता मधे सुधा माहागाई मुळे येऊ शकते कारण सत्ताधारी लोक राजकरनी सर्व पक्षी लोक ज्या गोष्टीवर काम करावयास पाहिजे त्या वर काम करत नाहीत । जाती- जाती मधे भांडाने लावने , जे प्रश्न सामान्या चे नाहीत त्या प्रश्नवार लक्ष केंद्रित करून लोकांचे मन भरकटवने । हे प्रकार चालू आहेत। रोजगारा कडे, तरुणांच्या नौकरी कडे लक्ष न देने माहागाई मुळे श्रीलंके सारखी परिस्थिति येत्या १० वर्षात भारतात निर्माण होऊ शकते असा इशारा कडा कृ.उ.बा समिति चे संचालक हिराशेठ बलदोटा यांनी दिला आहे.
stay connected