कडा येथील ज्योती क्रांती मल्टीस्टेट पतसंस्था या ठिकाणी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संपन्न

 कडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली 

कडा - अनिल मोरे 


आष्टी तालुक्यातील कडा येथील ज्योती क्रांती मल्टीस्टेट  पतसंस्था या ठिकाणी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संपन्न करण्यात आली.

यावेळी पुढे बोलताना गणेश गुंजाळ यांनी सांगितले की,महीलांसाठी स्री शिक्षणाचे दारे उघडे केले पूर्वी महिलांना चुल आणि मुल यापुढे काहीच करण्याचा तसेच घराबाहेर पडण्याचा मुलभुत अधिकार नव्हता त्याचबरोबर विधवा महिलेला दुसरे लग्न करण्याचा ही अधिकार नव्हता परंतु महात्मा ज्योतिबा फुलेनी त्याची पत्नी माता सावित्रीबाई फुले यांना शिकवले व माता सावित्री बाई फुलेनी समग्र महिलेला शिकवले व आज प्रत्येक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजामधे वावरत आहेत

आज महीला कलेक्टर डॉक्टर  वकील इंजीनियर झाले आहेत यामागे फुले दापत्यांचे योगदान असल्याचे मत गणेश गुंजाळ यांनी व्यक्त केले.यावेळी रसायली मॅडम व खाते दार उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.