डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद निमित्त कडा येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न...
संदिप जाधव/आष्टी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व मुस्लिम सामाजाचा पवित्र असणारा सन रमजान ईद निमित्त कडा येथील पोलिस चौकीच्या आवारात आष्टीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली...
या बैठकीमध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.पुढे बोलताना विजय देशमुख म्हणाले की,होणारे जे कार्यक्रम आहेत ते शांततेच्या मार्गाने करावे त्याचबरोबर मिरवणूकीचा वेळ हा साधारणपणे १२वाजेपर्यत असेल त्याचबरोबर मिरवणूकीमध्ये लहान बालक,महीला व वयोवृध्द व्यक्तीना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद हा सन सुद्धा सर्वांनी साजरा करावा.व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे अशा सूचना दिल्या.
त्याचबरोबर कडा शहराचे सरपंच अनिल ढोबळे म्हणाले की,कडा शहराची पुर्वी पासुन सर्व धर्म समभाव असलेली परंपरा आजतागायत कायम टिकून आहे.शिवजयंती असो किंवा भिमजयंती असो तसेच मौलाली बाबा यात्रा उत्सव असो यामध्ये कडा वासीय सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र साजरी करतात.
यामध्ये ११ एप्रिल ला महात्मा फुले जयंती निमित्त सायंकाळी ७:०० वा भिमशाहीर अशोक निकाळजे यांचा भिमगितांचा कार्यक्रम तसेच १३एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिर व १४तारखेला सकाळी १०:०० वा.डाॅ आंबेडकर चौकात ध्वजारोहण व सायंकाळी ५:०० वा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.अशा प्रकारे कार्यक्रमाची रुपरेषा आहे.
यावेळी उपस्थित सरपंच अनिल ढोबळे, मुस्ताक पानसरे,रमेश जाधव किशोर घोडके,दिपक गरूड,पिंटू जाधव, बाळासाहेब घोडके,अमोल साळवे,दिपक जाधव, पत्रकार रहेमान सय्यद,आरीफ सय्यद,सचिन जाधव,बंटी घोडके,काका घोडके,सागर जाधव,सोनू जाधव,सागर घोडके,अविनाश जाधव अक्षय जाधव,अक्षय गरुड पत्रकार संदिप जाधव व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांनी मानले.
stay connected