उत्तर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नगरच्या शरीर सौष्ठवपटूंचे यश सद्दाम शेख ने सुवर्ण तर विनोद सुरेकरने पटकाविले कास्यपदक स्वराज फिटनेसच्या वतीने शरीर सौष्ठवपटूंचा सत्कार

 उत्तर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नगरच्या शरीर सौष्ठवपटूंचे यश

सद्दाम शेख ने सुवर्ण तर विनोद सुरेकरने पटकाविले कास्यपदक

स्वराज फिटनेसच्या वतीने शरीर सौष्ठवपटूंचा सत्कार




अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणारे सद्दाम शेख व कास्य पदक पटकाविणारे विनोद सुरेकर या शरीर सौष्ठवपटूंचा केडगाव येथील स्वराज फिटनेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी स्वराज फिटनेसचे दीपक बरस्कर, प्रतीक साळवे, अनुप कांबळे आदी उपस्थित होते.

नाशिक येथे नुकतीच उत्तर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धा दिंडोरी श्री 2022 पार पडली. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून शरीर सौष्ठवपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये स्वराज फिटनेसचे प्रशिक्षक असलेले सद्दाम शेख यांनी 60 किलो वजन गटात सुवर्णं पदक व विनोद सुरेकर याने 80 किलो वजन गटात कास्यपदकाची कमाई केली. 

दीपक बरस्कर म्हणाले की, सदृढ शरीर हीच मनुष्याची खरी संपत्ती असून, निरोगी शरीरासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. युवकांनी व्यायामाकडे लक्ष केंद्रित केल्यास व्यसनाधिनता कमी होणार आहे. युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याकरिता स्वराज फिटनेसच्या वतीने प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.