*केजमधे होणार स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे सांस्कृतीक सभागृह केजला मिळनार सांस्कृतिक वारसा.*

 *केजमधे होणार स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे सांस्कृतीक सभागृह

केजला मिळनार सांस्कृतिक वारसा.*



केज प्रतिनिधी दि.1


स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर आणि त्यांच्या विचारांवर प्रचंड प्रेम करणारे केज मधील जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारुणभाई इनामदार यांच्या प्रयत्नातुन केजमधील सध्या डीवायएसपी कार्यालय असलेली जागा आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची न राहता केज नगरपंचायतच्या मालकीची झाली आहे. त्या जागेची नगरपंचायतच्या मालमत्ता रजिस्टरला नोंद घेताना स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे सांस्कृतीक सभागृह असी नोंद घेण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी लवकरच म़ुंडे साहेबांच्या नावाने भव्यदिव्य असे सांस्कृतीक सभागृह उभारले जाणार आहे.

         याबाबत सविस्तर माहिती असी की, केज शहरातील सध्या डीवायएसपी कार्यालय असलेली जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने नोंद होती. तसेच डीवायएसपी कार्यालयाचे बांधकाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चालू आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. यामुळे लवकरच डीवायएसपी कार्यालय त्या ठिकाणी स्थलांतरीत होईल. डीवायएसपी कार्यालयाच्या सध्याच्या जागेवर स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सांस्कृतीक सभागृह व्हावे म्हणून त्यांच्यावर व त्यांच्या विचारांवर प्रचंड प्रेम करणारे त्यांचे चाहते असलेले हारुणभाई इनामदार यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून आता रितसर नगरपंचायत च्या मालमत्ता रजिस्टर मध्ये याबाबत नोंद घेण्यात आली आहे. याबद्दल जनविकास परीवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा असलेले हारुणभाई इनामदार तसेच नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड आणि नगरसेवक व जनविकास आघडीच्या सर्व नेत्यांचे नाट्यप्रेमींनी न केज येथील कलावंत अनिल वैरागे अजय गायकवाड दिलीप खाडे मुनीर भाई कुरेशी ग्रामसेवक सुखदेव कांबळे मेजर संग्राम आरखडे विद्रोही भिमशाहिर मधुकर कदम बळी दही रे या सर्व कलावंतांनी जन विकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हरुणभाई इनामदार यांच्या निवासस्थानी जाऊन केज नगरपंचायत चा नगराध्यक्षा सीता ताई बनसोड व हरून भाई इनामदार यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.