बीड शासकीय विश्रामगृहातील चिंच, कडुनिंब आदि २५ झाडांची कत्तल ;जिल्हाप्रशासनाचे धोरण झाडांच्या मुळावर:-डाॅ.गणेश ढवळे

 बीड शासकीय विश्रामगृहातील चिंच, कडुनिंब आदि २५ झाडांची कत्तल ;जिल्हाप्रशासनाचे धोरण झाडांच्या मुळावर:-डाॅ.गणेश ढवळे 

____






नविन विश्रामगृह ईमारतीच्या नावाखाली शासकीय विश्रामगृह आवारातील चिंच, कडुनिंब आदि झाडांची मोठ्याप्रमाणात कत्तल करण्यात येत असून बांधकाम जागेच्या व्यतरिक्त चंपावती क्रिडा मंडळ मैदान लगत असणारी झाडे सुद्धा तोडण्यात आली असून झाडे तोडणारी मजुरांना परवानगीची कागदपत्रे मागितली असता व्यापा-याकडे आहेत एवढंच उत्तरि मिळाले,वाट पाहुन सुद्धा व्यापारी आलाच नाही संबधित प्रकरणात उपविभागीय आधिकारी बीड यांना फोनवरून विचारले असता मला या विषयी कल्पना नसुन सीईओ यांना विचारून सांगतो म्हणाले. 

     एकंदरीतच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कडुनिंबाचे झाड, जिल्हा क्रिडा संकुलातील झाडे तोडल्यानंतर आता शासकीय विश्रामगृहातील झाडे तोडण्याचे जिल्हा प्रशासनाचे धोरण "झाडे लावा-झाडे जगवा " या उपक्रमाला हानिकारक असून निषेधार्ह आहे. विविध सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांनी निवेदन, आंदोलनानंतर सुद्धा जिल्हाप्रशासनाचे धोरण झाडांच्या मुळावरच दिसुन येते. 


डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

मो. नं.८१८०९२७५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.