कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नायब तहसिलदारास दिले बेशरम भेट

 कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नायब तहसिलदारास दिले बेशरम भेट

परळी (प्रतिनीधी)


 परळी तहसिल कार्यालयात राशन कार्ड ऑनलाईन,दुरुस्ती करण्यासाठी गत सहा महिन्यापासुन डाटा एंट्री बंद असल्याचे सांगितले जाते परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांच्या दारात जाऊन डाटा एंट्री केली जात असल्याने कॉंग्रेसचे शहराध्यक्ष स.हनिफ उर्फ बहादुरभाई यांनी आपल्या कार्यकर्त्यासह नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांना बेशरमाची झाडे देवुन तहसिलच्या या कारभाराचा निषेध केला.

 परळी तहसिल कार्यालयात गत सहा महिन्यापासुन डाटा एंट्री बंद असल्याने हजारो नागरीक शासनाच्या स्वस्त धान्यानासुन वंचित आहेत.सर्व्हर चालत नसल्याचे कारण पुढे करत नागरीकांना तहसिल मधुन हाकालले जात आहे तर उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे,तहसिलदार सुरेश शेजुळ,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर हे स्वत: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांच्या दारात जावुन शिबीर राबवत राशन कार्ड दुरुस्ती,ऑनलाईन करत आहेत. परळी शहरातील नागरीकांचा सर्व्हे करत कॉंग्रेसने असंख्य नागरीकांच्या राशनबाबतच्या तक्रारी जमा करत या तक्रारींची सोडवणुक करावी अशी मागणी चार महिन्यापुर्वी केलेली असताना याबाबत तहसिलदार यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याने कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ हे मंगळवार दि.29 रोजी कार्यकर्त्यासह तहसिल कार्यालयात पोंहचले त्यांनी नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांना बेशरमाची झाडे देवुन निषेध केला.यावेळी नायब तहसिलदारांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली यामुळे काही काळ तहसिल परिसरात तणावाचे वातावरण होते. 

या अनोख्या आंदोलनात कॉंग्रेसचे विधान सभा अध्यक्ष रणजित देशमुख,उपाध्यक्ष सुभाष देशमुख,शशि चौधरी,वैजनाथ गाडेकर,इतेशम्म खातीब,गणपत कोरे,शिवाजी देशमुख, अजय राठोड,शिवाजी दौंड, धर्मराज खोसे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.