*श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आष्टी विभागातर्फे आणलेल्या धर्मवीर ज्वालेच आष्टी तालुक्यात आगमन..* ---------------

 *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आष्टी विभागातर्फे आणलेल्या धर्मवीर ज्वालेच आष्टी तालुक्यात आगमन..*

---------------


कडा( प्रतिनिधी,.)अनिल मोरे धर्मवीर छत्रपती श्री

संभाजी महाराज यांच्या बलिदान मास निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक २७-३-२०२२ रोजी श्री क्षेत्र वढु. बुद्रुक ,धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधीस्थानापासून धर्मवीर ज्वाला (धर्मज्योत) पेटवून आणण्यात आली.सायंकाळी ठिक ८:०० वाजता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ धारकरी मा.श्री. प्रविणबापू मरकळे व मा.स्वप्निल शिवले पाटील,यांच्या हस्ते ज्वाला पेटवून आष्टीच्या दिशेने प्रस्थान करण्यात आले. तत्पूर्वी श्री क्षेत्र तूळापुर व श्री क्षेत्र वढु बुद्रुक याठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज व छंदोगामात्य कवी कलश यांच्या समधीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.रविवारी सायंकाळी ८:०० वाजता निघालेली धर्मज्योत सोमवारी सकाळी आष्टीमध्ये ८:०० वाजता पोहोचली.वढुहून आष्टीमध्ये आणलेली  ज्योत तालुक्यातील ठिकठिकाणच्या गावातील धारकर्यानीं प्रज्वलीत करून आपापल्या गावी नेण्यात आली.

श्री क्षेत्र वढु बुद्रुक ते आष्टी १५४ की.मी चे अंतर धारकर्यानी अवघ्या १२ तासात एक क्षणही न थांबता पळत पूर्ण केले.

           गेल्या महिनाभरापासून श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आष्टी विभागातर्फे तालुक्यातील जवळपास १७ गावात मोठ्या निष्ठेने धर्मवीर बलीदान मास पाळला जातो. यात लहान मुलांपासून आबालवृद्ध सहभागी असतात.

         धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी दिलेल्या दिव्य बलिदानाची आठवण म्हणून हा बलिदान मास मोठ्या श्रध्देने पाळण्यात येतो.यात आखाड्यातील धारकरी मुले व मुली महिनाभर पायात पादत्राणे न घालने,मिष्टान्न न खाणे,चहा न पिणे,  दिवसाकाठी एकच वेळेस जेवण करणे, यासारखे  आचार पाळतात.

           ही धर्मज्योत आणण्याकरिता 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नगर जिल्हाप्रमुख मा.श्री.अरुणबापु ठाणगे,

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नगर जिल्हा मार्गदर्शक मा. डॉक्टर श्री एकनाथराव मुंढे, धारकरी श्री प्रविणराव जरे,धारकरी सागरदादा डोके, धारकरी निलेश गोड, धारकरी श्री परशुराम डांगरे,तसेच श्री शंभुसुर्य मर्दानी आखाड्यातील सर्वच विद्यार्थ्यानी मोठे परिश्रम घेतले.

 🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.