वसईच्या सुप्रसिद्ध कवयित्री ..काव्यप्रांजू... राज्यस्तरीय साहित्य रत्न नारी गौरव पुरस्काराने सन्मानित......

 वसईच्या सुप्रसिद्ध कवयित्री ..काव्यप्रांजू... राज्यस्तरीय 

साहित्य रत्न नारी गौरव पुरस्काराने सन्मानित......



काव्यांगण साहित्य मंच तथा बहुऊद्देशीय संस्था,लातूर शाखा आयोजित

श्री अनंतपाळ राज्यस्तरीय पहिले मराठी काव्यसंमेलन २०२२

श्री अनंतपाळ मंगलकार्यालय,लातूर येथे दि २९/३/२०२२ रोजी आयोजित करण्यात आले.या भव्य दिव्य काव्यसंमेलनात

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सुप्रसिद्ध कवयित्री काव्यप्रांजू यांचे  स्वागत मा.सुवर्णाताई इचलकरंजीकर यांनी केले....

तसेच आनंददायी क्षणातच वसईच्या सुप्रसिद्ध कवयित्री प्रांजली प्रविण काळबेंडे(काव्यप्रांजू)यांना त्यांच्या सखोल साहित्यिक वाटचालीसाठी राज्यस्तरीय साहित्य रत्न नारी गौरव पुरस्कार २०२२ कार्यक्रम/संमेलन उद्घाटक मा. सुषमाताई मठपती यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्राभर काव्यप्रांजू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षांव होत आहे. त्यांच्या भरीव लिखाणाला नावलौकिक मिळत आहे नुकताच त्यांचा "ऋतू बरवा" हा काव्यसंग्रह प्रकाशीत झाला आहे. या काव्यसंग्रहालाही छान प्रतिसाद मिळत आहे.

काव्यप्रांजू या संवेदनशील कवयित्री असून समाजातील प्रत्येक भाव टिपण्यात त्यांचा हातखंडा आहे.

काव्यप्रांजू यांचा दुसरा काव्यसंग्रह सुद्धा प्रकारच्या वाटेवर..त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हा  पुरस्कार प्रोत्साहन देणारा ठरणार आहे असे त्या मुलाखतीत वार्ताहरांशी सुसंवाद साधताना म्हणाल्या तसेचकाव्यसंमेलन आयोजक

काव्यांगण साहित्य मंच लातूर अध्यक्ष श्री गोविंद  श्रीमंगल  सरजी ,उपाध्यक्ष मा. सरोजा गायकवाड ताई,उद्घाटक मा सुषमा मठपती ताई ,संमेलनाध्यक्ष मख. डॉ लक्ष्मण शिवणेकर

काव्यांगण साहित्य मंच अध्यक्ष मा राजू पाडेकर सर..व

सर्व शुभेच्छुकांचे मनस्वी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.