*कवी प्रेम पवळ यांची आष्टी तालुका अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अध्यक्षपदी निवड*
शब्दांकन : संजय पंडित
महाराष्ट्रात गाजलेले तसेच काव्य क्षेत्रात आपली नवीन ओळख निर्माण करणारे कवी प्रेम पवळ यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे "आष्टी तालुका अध्यक्ष" पद बहाल करण्यात आले आहे. हे पद त्यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत देण्यात आले.
कवी प्रेम पवळ यांच्या बद्दल सांगायचं झालं तर ते नाभिक समाजातील व्यावसायीक व्यक्तिमत्त्व असून त्यांचा सलूनचा व्यवसाय आहे.
तसा त्यांना कवितेचा छंद होताच आणि याच छंदामुळे ते आपल नाव महाराष्ट्रात गाजऊ शकले. त्याचं शिक्षण बी.एस.सी. पदवीधर त्यांच्या आत्तापर्यंत कविता व चारोळ्या एकूण ५८४३ प्रकाशित आहेत. या कविता आणि चारोळ्या मार्फत त्यांनी तरुणांना जगण्याची प्रेरणा दिली.
सा.आदर्श पोलखोल याचे सहसंपादक, वात्रटिकाकर म्हणुन प्रसिध्द तसेच तेजवार्ता साप्ताहिक, दै.लोकमंथन (४ वर्ष अनुभव) दै.टाइम्स, दै.राज्य लोकतंत्र, साप्ताहिक. लोकनाथ या दैनिकांसाठी ते काम करतात. एवढच नव्हे तर भाव माझ्या मनातला, तू सुचवलं म्हणुन, प्रेमची सत्यवानी, वेदनेच्या पाऊलखुणा, राजकारण गेलं चुलीत, एकांत हे काव्य संग्रह सुध्दा प्रकाशित आहेत.
अशाप्रकारे दैनिकांसाठी आणि त्यांचे काव्यसंग्रह तर आहेतच त्याच प्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कार त्यात पाहायला गेलं तर हजरत टिपू सुलतान महाराष्ट्र राज्य, समाजरत्न महाराष्ट्र राज्य मुंबई, विदर्भाचा अष्टपैलू राज्यस्तरीय पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष कडून कोविड योध्दा, समाज भुषण राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्राचा काव्य सम्राट (प्रेरणा फाउंडेशन बदलापूर मुंबई), आंतरराष्ट्रीय चषक पुरस्कार त्याच प्रमाणे रेडिओ वाहिनीवर मुलाखत सुद्धा प्रसिद्ध आहे. हा होता त्यांचा अल्पसा परिचय आणि त्यांची काव्य क्षेत्रातील कामगिरी.
आता पहायला गेल तर अजुन एक मोलाचं काम त्यांना सोपवल गेलय ते म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद "आष्टी तालुका अध्यक्ष"पद त्यांना या यशामुळे पंचक्रोशीतील चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत आणि ते या पुढेही असेच अविरतपणे कार्यरत रहातील हिच त्यांच्या चाहत्यांची माफक अपेक्षा आहे.
stay connected