जिल्हा नोंदणी व मुद्रांक कार्यालयातील सीसीटीव्हीचे नारळ फोडुन, पेढे वाटुन स्वागत:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
_______
बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नोंदणी व मुद्रांक कार्यालयात कालच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचे आज सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर ,आप शहराध्यक्ष सादेक सय्यद आदिंनी श्रीफळ फोडुन व पेढे वाटुन स्वागत करण्यात आले.
सविस्तर माहीतीस्तव
____
जिल्हा नोंदणी व मुद्रांक कार्यालयातील महिनाभरापुर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर कायदा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बीडचा बिहार झाल्याची वाच्यता थेट विधानसभेत लोकप्रतिनिधींनी मांडली होती.
मुद्रांक कार्यालयातील गोळीबार हार्डडिस्क गायब प्रकरणात गुन्हे दाखल करा:-डाॅ.गणेश ढवळे
______
कोट्यावधी रूपयांचा दररोज आर्थिक उलाढाल होणा-या जिल्हा नोंदणी व मुद्रांक कार्यालयात ३ वर्षापुर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते परंतु हार्डडिस्क बसविण्यात आली नसल्याचा खुलासा कार्यालयाने पोलिसांना पत्रान्वये कळविण्यात आला असून संबधित प्रकरणात चौकशी करून संबंधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. कारण रेकॉर्डींग होत नसेल तर त्याचा उपयोग काय?? पोलिसांना संबधित प्रकरणात तपास कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पोलीस प्रशासनाने कर्तव्य निभावण्याऐवजी गुन्हे दाखल करून दडपशाहीचा प्रकार निषेधार्ह
____
गेल्या महिन्यात जिल्हा नोंदणी व मुद्रांक कार्यालयातील गोळीबार प्रकरणात हार्डडिस्क गायब प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी राजीनामा द्यावा अशी जनमाणसातील संतप्त प्रतिक्रीया सोशल मिडीयावर व्यक्त केल्यानंतर आम आदमी पार्टी बीड जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांच्याविरोधात पोलिसांप्रती अप्रीती निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता, म्हणजेच एकंदरीतच पोलिसांनी कर्तव्य बजावण्याऐवजी त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारांवर गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रकार निषेधार्ह असुन आज लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि हार्डडिस्क दुर्दैवाने भविष्यात दुर्घटना घडल्यास पोलीस तपासात उपयोगी पडतील अशी आशा व्यक्त करतो.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.८१८०९२७५८२
stay connected