*गुढी पाडवा, रमजान , रामनवमी यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या आधी रेशनचे मोफत धान्य वाटप करा - सलीम जहाँगीर*

 *गुढी पाडवा, रमजान , रामनवमी यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या आधी रेशनचे मोफत धान्य वाटप करा - सलीम जहाँगीर*  



जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देताच प्रशासनाने पत्र काढले 


बीड ( प्रतिनिधी )  आगामी काही दिवसात गुडी पाडवा , रमजान , रामनवमी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आणि सणाच्या अगोदर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना केंद्र सरकारच्या योजनेचे मोफत अन्न धान्य वाटपाचे आदेश तात्काळ देण्यात यावे अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशमुख यांनी तातडीने दखल घेत सर्व तहसील पुरवठा विभागांना पत्र काढले असून धान्य वाटपाच्या सूचना दिल्या आहेत.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन  आणि कोरोनामध्ये रेशन दुकानातुन कार्ड धारकांना मोफत धान्य वाटपाची योजना राबवली होती. यामुळे करोडो गोरगरीब कुटुंबांना याचा लाभ मिळाला. दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सप्टेंबर2022 पर्यंत म्हणजेच तब्बल सहा महीने मोफत अन्न धान्य पुरवठा व वाटपाचा निर्णय घेतला आहे. यामुळे गोरगरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदरील योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे या स्वतः वितरण प्रकियेवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भाजपची टीम शहरी आणि ग्रामीण भागातील वितरणावर लक्ष ठेवणार आहे. त्यादृष्टीने भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकारी देशमुख यांना निवेदन दिले आहे. यावेळी सलीम जहाँगीर यांनी त्यांच्याशी चर्चा करून गुढी पाडवा , रमजान, रामनवमी, डॉ. बाबाासाहेब आंबेडकर जयंती या सर्व सण - उत्सवाचे आगोदर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना तात्काळ मोफत धान्याचा कोठा द्यावा आणि त्यांनाही सण- उत्सवाच्या आधी मोफत धान्य वाटप करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली.  त्याची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी देशमुख यांनी सर्व तहसीलदार पुरवठा यांना पत्र काढून सूचना दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.