नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी.... प्रतिनिधी : संजय पंडित

 नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी....



प्रतिनिधी : संजय पंडित


राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळतेय. या निकलांमध्ये राष्ट्रवादी नंबर वन, भाजप दोन, काँग्रेस तीन तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीने २७, भाजप २४, काँग्रेस २२, शिवसेना १७ नगरपंचायतीवर विजय मिळवला आहे. विजयानंतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. सांगलीतील कवठेमहाकाळमध्ये रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. येथे त्यांनी निवडणूक जिंकली. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जळगावातील बोदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय होती. मात्र  जळगाव बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. एकनाथ खडसेंना शिवसेनेने धोबीपछाड दिलाय.

नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल २०२२


🛑 एकूण नगरपंचायती-106

🛑 निकाल स्पष्ट झालेल्या नगरपंचायती- 96

🛑 निकाल बाकी असलेल्या नगरपंचायती- 3

🛑 एकूण सात नगरपंचायतींचे निकाल उद्या लागणार


— ———————————————-

🛑 भाजप- 24

🛑 काँग्रोस- 22

🛑 शिवसेना-17

🛑 राष्ट्रवादी-26

🛑 इतर-7


————————————————–

🛑 महाविकास आघाडी- 65

🛑 भाजप-24

🛑 इतर- 7

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.