*केज नगरपंचायत मध्ये आश्चर्यकारक निकाल.*
*वार्ड क्रमांक सहा व दोन मध्ये दिग्गजांना धक्का.*
केज (प्रतिनिधी) दि.१९ रोजी केज नगरपंचायत च्या झालेल्या निवडणुकीमध्ये आज केज तहसील कार्यालय या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली असुन, यामध्ये केज नगरपंचायत मध्ये जनतेने या वेळेस जनविकास परिवर्तन आघाडीला कौल दिला आहे. केज नगरपंचायत मध्ये जनविकास परिवर्तन आघाडी ०८ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ०५ राष्ट्रीय कांग्रेस पार्टी ०३ व ०१अपक्ष उमेदवार निवडून आले असल्याने याठिकाणी नगरपंचायत मध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार याकडे केज वासी यांचे लक्ष लागले आहे. परंतु केज नगरपंचायत मध्ये दिग्गजांना धक्का बसला आहे. जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हरून भाई इनामदार यांचा पराभव तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या कन्या हर्षदा बजरंग सोनवणे पराभव झाला असून, केज नगरपंचायत मध्ये दिग्गज नेत्यांनाधक्का बसला आहे.
1- शेख अझहरोद्दीन बशिरोद्दीन - 531 विजयी
2- आशाताई सुग्रीव कराड-605 विजयी
3-आदित्य अशोकराव पाटील -543 विजयी
4- आधारे शकुंतला सज्जन - 444 विजयी
5- सोजरबाई शिवाजी गाढवे - 294 विजयी
6-जाधव बालासाहेब दत्तात्रय - 444 विजयी
7-बनसोडे सीता प्रदीप - 560 विजयी
8-इनामदार आलिया बेगम हारून - 519 विजयी
9- शिंदे पदमीन गुलाब - 354 विजयी
10-इनामदार रेश्मा जलालोद्दीन - 445 विजयी
11-इनामदार तरमीमबेगम गजमफर - 523 विजयी
12- सोमनाथ बाळासाहेब गुंड-521 विजयी
13-शितल पशुपतीनाथ दांगट -475 विजयी
14- शेख तसलीम युनूस-396 विजयी
15-गुंड रामचंद्र विठ्ठल राव -767 विजयी
16-राजणकर पल्लवी ओमप्रकाश-356 विजयी
17-इनामदार जकोयोद्दिन महेबुबमिय्या -454 विजयी
-राष्ट्रवादी-05
-कांग्रेस-03
-जनविकास अ-08
-अपक्ष-01
stay connected