"अक्राँस मुंबई, अक्राँस स्टेट" समुहाच्या संयुक्त विद्यमाने *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या गोरेगाव कार्यालयाचे उद्घाटन!*

 "अक्राँस मुंबई, अक्राँस स्टेट" समुहाच्या  संयुक्त विद्यमाने

*डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या गोरेगाव कार्यालयाचे उद्घाटन!* 





मुंबई, (उदय नरे) राज्यात ज्येष्ठ संपादक व संस्थापक राजा माने यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गतीने विस्तार होत असलेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे मुंबई अध्यक्ष संजय भैरे यांच्या प्रयत्न नेतृत्वाखाली गोरेगाव विभागीय कार्यालयाचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात काल मालाड येथे पार पडला.

अक्राँस मुंबई अक्राँस स्टेट या वृत्तपत्र समुहाचे मालक, संपादक  संघटनेच्या मुंबईचे अध्यक्ष संजय भैरे व सौ.सुचिता संजय भैरे यांच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालकाचे माजी उपसंचालक श्री. देवेंद्र भुजबळ, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष श्री. तुळशीदास भोईटे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त श्री. अजय वैद्य, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ श्री. अमित मेहता,संघटनेचे राज्य  कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ दीपक नलावडे, अभिनेते सुदेश म्हशीलकर, राजू राहिकवार(ज्युनियर शाहरूख खान) ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघोळे, रमेश शर्मा, मनोज देवकर, समिर विजय कुमार, कपिल गुप्ता, जालंदर चकोर, आरजू चहांडे, अरुषा पांडे, अँडव्होकेट प्रदिप भट, सुनील कामत, पंडित मोहिते पाटील, सुरेंद्र खानविलकर, सचिन सावंत, देवेंद्र खन्ना रिध्दी बत्रा, सुचिता भैरे, श्रीराज नायर, आशा मेनन, महेश कदम, विरेंद्र मिश्री, नागेश कळसगौंड, दत्ता जाधव, हर्षद मोरे, मनोहर मोरे. आदि मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉक्टर सुचिता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्राँस स्टेट वृत्तवाहिनी समुहाचे मालक, संपादक श्री. संजय भैरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.