पत्रकार जावेद पठाण यांना पितृशोक
आष्टी। प्रतिनिधी
येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी गफूर रसूल खान पठाण वय - ६५ यांचे अहमदनगर येथे उपचार चालू असताना सोमवारी रात्री निधन झाले.त्याच्या पार्थिवावर सकाळी १० वाजता आष्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.गेली अनेक वर्षे ते आष्टी येथील पाटबंधारे विभाग येथे चौकीदार या पदावर कार्यरत होते ते मनमिळावू स्वभावाचे होते .आष्टी येथील पत्रकार जावेद पठाण यांचे ते वडील होते.त्याच्या अकाली निधनाने पठाण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळल्याने त्यांच्या दुःखात तेजवार्ता परिवार सहभागी आहे.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .
stay connected