आष्टी तालुका कोरोणा मुक्त होईपर्यंत ध्रुव कोव्हिड हाँस्पिटल सुरुच राहणार -----डॉ. युवराज तरटे

 आष्टी तालुका कोरोणा मुक्त होईपर्यंत ध्रुव कोव्हिड हाँस्पिटल सुरुच राहणार

-----डॉ. युवराज तरटे

****************



*****************

आष्टी (प्रतिनिधी)

कोरोना सारखे संकट मानव जातीवर आले आहे. सर्वत्र अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली. वैद्यकीय क्षेत्र अगदी ढवळुन निघाले.कुठेही बेड शिल्लक नव्हता, आँक्सिजनची कमतरता निर्माण झाली, रेमडिसिवीर औषध तुडवडा यामुळे सर्वसामान्य माणूस सैरभैर झाला होता.याच दरम्यान आष्टी तालुक्यातील मातकुळी गावाचे सुपुत्र डॉ. सुदाम जरे हे पुढे आले.आपल्या जन्मभुमीच्या   ऋणामधुन मुक्त होण्यासाठी त्यांनी आष्टी तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी शहरामध्ये ५० बेडचे ध्रुव कोव्हीड हाँस्पिटल उभारले.यामध्ये १५ आँक्सिजन ३ बायपॅप व २ व्हेंन्टीलेटर आणि ३० सामान्य बेड अशी व्यवस्था केली.ध्रुव कोव्हिड हॉस्पिटलमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला.

डाॅ.सुदाम जरे हे एम.बी.बी.एस.एम.डी.डी.एम कार्डिओलाॅजीस्ट आहेत. त्यांनी हैद्राबाद ,पुणे येथे काम केले व गेल्या पाच वर्षांपासून ते अहमदनगर येथे मॅक्सकेअर हाॅस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ञ म्हणून काम करत आहेत. डॉ. जरे यांच्या ज्ञानाचा उपयोग आष्टीकरांना तर झालाच त्याचबरोबर ,जामखेड ,कर्जत ,श्रीगोंदा ,पाथर्डी, करमाळा, पाटोदा, शिरूर याही तालुक्यातील लोकांना झाला. मुळ आष्टीचे पण पुण्यात नौकरी साठी गेलेल्याना पुण्यामध्ये बेड उपलब्ध झाला नाही म्हणून ते थेट आष्टीला आले व कोरोना मुक्त होवून गेले. ध्रुव हाँस्पिटल मध्ये आज पर्यंन्त ५०० च्या वर रुग्णांनी उपचार घेतले आहेत व आपल्या घराजवळ कोरोनासारख्या आजारावर उपचार मिळाल्याने लोक समाधानी आहेत.या हाँस्पिटलमध्ये पाच डाॅक्टर ,सोळा नर्स, चार वार्डबाँय ,सहा सफाई कामगार आहेत. येथे रुग्णांना व नातेवाईकांना दोन वेळचे जेवन व सकाळी पोष्टीक नास्टा दिला जातो. सदपरिस्थितीत रुग्ण संख्या कमी झाली म्हणुण लगेच हाँस्पिटल बंद करणार नाहीत तर आष्टी तालुक्यात रुग्ण संख्या शुन्यावर येईपर्यंत हे हाँस्पिटल सुरु ठेवण्याचा डॉ. जरे यांचा मानस आहे अशी माहिती डॉ. युवराज तरटे व संचालक श्याम धस  यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.