सासू सासऱ्यांनाही देव माना?

 सासू सासऱ्यांनाही देव माना?


           आईवडील देव असतात. हे ऐकलं बरेचदा. तसं मानतातही लोकं. कारण आईवडील हे जन्म देतात व ते आपल्याला लहानाचे मोठे करीत असतात. म्हणूनच ते आवडतात. परंतु जर आपला विवाह झालाच आणि सासूसासरे आलेच तर ते सासू सासरे आपल्याला डोईजड वाटायला लागतात. कारण ते आपलं उदर फाडून जन्म देत नाहीत. ते आपल्याला लहानाचं मोठं करीत नाहीत. ते आपल्याला उन्हातून सावलीत नेत नाहीत. परंतु हे जरी खरं असलं तरी ते जे काम करतात. ते काम कोणीच करीत नाहीत.

           सांसरीक जीवन. हे जीवन अतिशय महत्वाचं असतं. त्या जीवनात सुख व समृद्धी येत असते. माणसाची माणूसकी शाबूत राहाते. ते जीवन मिळतं, जेव्हा विवाह होतो. परंतु  ते जीवन मिळवायचे असल्यास सासू सासऱ्यांची भुमिका अतिशय महत्त्वपूर्ण असते. ते आपण वाढविलेलं लेकरु काहीही स्वार्थ न ठेवता पुरेशी ओळख नसलेल्या व्यक्तीसमुहाच्या स्वाधीन करतात. ज्यातून वंशवाढ होते. आज वंशवाढ करतांना सासूसासरेच कामात येतात. त्या सासूसासऱ्यांमुळं संसार फुलतो. संसारवेल बहरते. खरं तर सासूसासरे हे संसारचक्रातील घटकच असतात. परंतु आज सासूसासऱ्यांना मोजले जात नाही. त्यांची हेळसांड केली जाते. त्यांना तुच्छ लेखले जाते. पदोपदी त्यांचा अपमान केला जातो. त्यांना कधी कधी मारलं जातं. कधीकधी प्रताडीतही केलं जातं. असं चित्र  काल नव्हतं. 

           काल सासूसासऱ्यांना इज्जत मिळायची. त्यांना पाहिजे तेवढा सन्मान मिळायचा. त्यांच्या तोंडाला तोंड दिलं जात नव्हतं. जरी ते त्रास देत असले तरी. कारण त्यावेळेस बालविवाह होत असे व बालविवाह करतेवेळेस नवऱ्या मुलीला सासू सासरे म्हणजे काय असतात? याची कल्पना नसायची. तीच गोष्ट वर मुलाबद्दलही घडायची. त्याचंही वय पाहिजे त्या प्रमाणात मोठं नसल्यानं त्यालाही विवाह म्हणजे काय? पत्नी म्हणजे काय? हे कळायचं नाही. 

         पुर्वीच्या काळात बालविवाह होत व मुली अगदी बालवयातच मुलांच्या घरी राहायला येत असत. अशा काळात त्या कमी वयातील मुलीला सांभाळून घेणे. त्यांना सांसरीक बाबी शिकवणे. या सर्व गोष्टी सासूसासरे करीत असत. ते आपल्या स्नुषेवर रागावत जरी असले तरी त्यांच्या एकंदर कृतीमध्ये प्रेम असायचं व ते जाहिरपणे दिसायचं. आजही तेच दिसतं. त्यामुळंच ते देवच भासतात. परंतु आजच्या मुली त्यांना देव मानत नाहीत. उलट त्यांच्यावर अत्याचार करतात. त्यांच्या वयाची दखल न घेता त्यांना राब राब राबवितात. त्यांना झाडू पोछा करायला लावतात, बर्तन, कपडे धुवायला लावतात आणि आपण मात्र एखाद्या  महाराणीसारखे अंथरुणावर झोपून मोबाईल पाहात बसतात. 

         काही काही मुलीही आजच्या काळातील बऱ्याच शहाण्या असतात. त्यांना आईवडिलांच्या घरी काम करणं आवडतं. कामालाही जाणं आवडतं. परंतु पतीच्या घरी कामाला जाणं आवडत नाही. अशीच एक मुलगी माझ्या संपर्कात आली. ती वडील नसल्यानं आईच्या घरी नोकरी करायला जात होती. तिचं वय झाल्यानं तिचा विवाह जुळविण्याचा योग होता. मग एक मुलगा तिला पाहायला आला. मुलगा साजरा होता. पुण्याला नोकरी होती. पंचवीस हजार रुपये वेतन होतं त्याला. वाटलं की मुलाचे पंचवीस व तिचे वीस धरुन पंचेचाळीस हजार रुपये त्यांना महिन्याकाठी पडेल. मग काय, पुणे महागडं असलं तरी एवढ्या वेतनानं त्याचं भागेलच. परंतु मुलीनं रिश्ता नाकारला. कारण विचारलं असता कळलं की त्याचा पंचवीस हजार रुपये पगार असल्यानं तो तिला पसंत नाही. पगार पाहिजे एक दिड लाख. त्यावर तिला विचारलं गेलं की तिचं वीस व त्याचं पंचवीस हजार रुपये वेतन पकडून पंचेचाळीस होतात. तेवढ्या पैशानं पुण्यात संसार करणं शक्य होईलच. त्यावर ती म्हणाली की ती आपल्या पतीच्या घरी कामालाच जाणार नाही. आता यावर विचार असा की आजच्या मुली मायबापाच्या घरी कामाला जावू शकतात. परंतु पतीच्या घरी त्यांना कामाला जाणं अजिबात आवडत नाही. आपल्या आईच्या घरी स्वयंपाक करणं आवडतं आणि पतीच्या घरी घरकामाचा नेट लागत असल्यानं हॉटेलातूनच जेवन मागवून खाणं आवडतं. मात्र मुलींचं त्याही विवाह झालेल्या मुलींचं असं वागणं बरं नाही. ज्यातून संसार तुटतो नव्हे तर तुटू शकतो.

        महत्वपुर्ण बाब ही की मुलं जशा आपल्या आईवडीलांना देव मानतात. तसंच त्यांनी आपल्या सासूसासऱ्यांनाही देवच मानावं. जेणेकरुन त्यातूनच संसार फुलेल. टिकेल व त्या संसारात वितुष्ट येणार नाही. निर्माण होणार नाही. कारण आपला संसार फुलायला जो आशीर्वाद लागतो. तो आशीर्वाद आटले आईवडील व आपल्याच सासूसासऱ्यांमुळं आपल्याला लाभतो. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.


          अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.