निळा ता.लोहा येथे माता द्रोपदा देवीची यात्रा व कुस्त्याची जंगी दंगल

 *निळा ता.लोहा येथे माता द्रोपदा देवीची यात्रा व कुस्त्याची जंगी दंगल*



लोहा/चंद्रकांत वाघमारे तालुक्यातील 

निळा (ब.) ता. लोहा येथे  माता द्रोपदा देवीची यात्रा व कुस्त्याची जंगी दंगल ३० मार्च ते ४ एप्रिल पर्यंत यात्रा महोत्सव निळा (ब.) येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात विविध  कार्यक्रम, हरिकिर्तन, महारुद्र अभिषेक, वाघ्या मुरळी कार्यक्रम, संगित दिंड्याचा जंगी सामना, पालकी मिरवणुक, आराधी गौधळ कार्यक्रम आणि कुस्त्यांची दंगल असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

माता द्रोपदा देवीची यात्रा व कुस्त्याची जंगी दंगल दंगल होईल

     मित्ती चैत्र शु. १२, दिनांक ३०/०३/२०२६, सोमवार (बारशी निमित्त्य) श्री महादेव मंदिर येथे सकाळी ११ ते १ श्री ह.भ.प. भगवान महाराज शेंद्रेकर यांचे हरिकिर्तन व नंतर महाप्रसाद.

     मित्ती चैत्र शु. पौर्णिमा शके १९४७, बुधवार, दि. ०१एप्रील२०२६, रात्री ८ वा. वाघ्या मुरळी कार्यक्रम.

पौर्णिमा शके १९४७, गुरुवार, दि.०२ एप्रील २६, सकाळी श्री महारुद्र अभिषेक व सायंकाळी महाप्रसाद.

 मित्ती चैत्र शु. पौर्णिमा शके १९४७, गुरुवार, दि. ०२एप्रील२०२६, रात्री ८ वा. संगित दिंड्याचा जंगी सामना.

    - मित्ती चैत्र कृ. १ शके १९४८ शुक्रवार, दि.०३एप्रील२०२६ रोजी श्री माता द्रोपदा देवीची पुजा-आरती व सायंकाळी भव्य पालकी मिरवणुक भव्य यात्रा.

    - मित्ती चैत्र शु. पौर्णिमा शके १९४७ शुक्रवार, दि.०३एप्रील२०२६, रात्री ८ वाजता आराधी गौधळ कार्यक्रम.

    - मित्ती चैत्र कृ.२ शके १९४८ शुक्रवार, दि.०४एप्रील२०२६, दुपारी १२ ते ४ पिटल-भाकर, महाप्रसाद नंतर दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल सुरु होईल. 


 *तदनंतर कुस्ती दंगलीचे बक्षीसवितरण*

    - पहिले बक्षीस: ₹३१००

    - दुसरे बक्षीस: ₹२१००

    - तिसरे बक्षीस: ₹११०० असेल 

यात्रा महोत्सवामध्ये

*नियम व अटी* यात्रा कमीटी चा निर्णय हा अंतिम असेल व 

    - कुस्ती दंगल संपल्यानंतर आलेल्या पहेलवानास बक्षीस दिले जाणार नाही.

    - जिवीताची जबाबदारी स्वतः पहेलवानावर राहील.

    - पंच कमिटीचा निर्णय अंतिम राहील


 समस्त गावकरी मंडळी च्या वतीने सर्व भाविक भक्तांना आणि कुस्ती प्रेमी जनतेला या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.