मुंबईत आगामी हिंदी चित्रपटासाठी ऑडिशन
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच वर्ल्ड बुक रेकॉर्ड विजेते लेखक-दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या आगामी हिंदी चित्रपटासाठी पुण्यात ऑडिशन प्रक्रिया पार पडली आहे. आता पुढील ऑडिशन मुंबईत अंधेरी वेस्ट येथे रविवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
बॉक्स ऑफिसवर सुपरहिट चित्रपट देणारे लेखक-दिग्दर्शक अल्ताफ शेख हे नव्या कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न करीत असून इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिनेमा क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी 8975303924 या क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रोफाइल पाठवावा, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.


stay connected