व्हॅलेंटाईन साजरा न करता व्यवसायावर प्रेम करा – युवा उद्योजक गणेश पाटील
कराड | प्रतिनिधी
१४ फेब्रुवारी हा दिवस अनेक ठिकाणी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. मात्र हा दिवस साजरा न करता आपल्या व्यवसायावर प्रेम करा, असा संदेश सुप्रसिद्ध पाटील वडेवालेचे संचालक तथा युवा उद्योजक गणेश पाटील यांनी दिला आहे.
कराड तालुक्यातील करवडी फाट्याजवळील पाटील वडेवाले हॉटेल हे परिसरात प्रसिद्ध असून येथे दूरदूरवरून ग्राहक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.
यावेळी तेजवार्ताशी बोलताना गणेश पाटील म्हणाले,
“व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापेक्षा आपल्या व्यवसायावर प्रेम करा. मेहनत, सेवा आणि ग्राहकांचे समाधान यातच खरे यश आहे.”
तसेच त्यांनी व्हॅलेंटाईन डे न साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,
“पुलवामा हल्ला विसरता येणार नाही, म्हणून आम्ही हा दिवस साजरा करत नाही.”
त्यांच्या या विचारांना अनेक ग्राहकांनीही पाठिंबा दर्शवला असून सामाजिक जाणीव जपत व्यवसायाशी निष्ठा ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला आहे.
---
तेजवार्ता प्रतिनिधी : विवेक बारमान (सातारा)


stay connected