दातांच्या मोफत तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद
आष्टी प्रतिनिधी
आष्टी जि.बीड येथील डॉ.सय्यद डेंटल क्लिनिक आयोजित,दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या दातांच्या मोफत तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला.अनेक दंत रुग्णांनी याचा लाभ घेतला.डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकचे डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांनी त्यांचे वडील महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन केले होते.मोफत तपासणी शिबिराचे हे तिसरे वर्ष आहे.यावर्षी डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांच्या सौ.डॉ.मेहवश यांचे सहकार्य लाभले.या शिबिराचा शुभारंभ डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.मधुकरराव हंबर्डे,वाहेत खान पठाण,अशोक देवा,हाजी हारून शेठ,सोळुंके नाना,हाजी सय्यद हबीब हुसेन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी गरजूवंत रुग्णांना पेस्ट व माऊथ वॉशचे मोफत वाटप केले.तथापि आष्टी जि.बीड येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत वाढदिवसानिमित्त कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचा आमदार सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



stay connected