कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी आयोजित २७ वे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात कथालेखक श्री बाळासाहेब देशमुखांचे कथाकथन

 *कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी आयोजित २७ वे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात कथालेखक श्री बाळासाहेब देशमुखांचे कथाकथन*



सातारा ( विवेक बारमन ) :-  २७ वे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन एक मार्च २०२६ रोजी सातारा येथे संपन्न होत आहे. 

ज्येष्ठ साहित्यिक,कवी श्री राजेंद्र फंड यांची संमेलनाध्यक्ष म्हणून  निवड झाली आहे.सदर साहित्य संमेलनामध्ये कथाकथन, कवी संमेलन , व्याख्यान, पुरस्कार असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

सदर संमेलन मध्ये कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना कथाकथन कार्यक्रम साठी निवड झाल्याची माहिती स्वाभिमानी वाचन मंदिर अध्यक्ष ,सुप्रसिद्ध साहित्यिक,कवी माननीय कवी सरकार उर्फ विलास पाटील यांनी दिली आहे. 

सदर संमेलनामध्ये  कथालेखक बाळासाहेब देशमुख हे ' पापी पेट का सवाल है ' हा प्रयोग कथाकथन मध्ये सादर करणार आहेत. देशमुखांचे  आजवर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ५०० प्रयोग शाळा, कॉलेज, सभागृह, ज्येष्ठ नागरिक संघ, इत्यादी ठिकाणी संपन्न झालेली असून, राज्यस्तरावरील महाराष्ट्राच्या विविध भागात नांदेड , देगलूर , कोल्हापूर, आळंदी, पुणे, बीड, नाशिक, सातारा येथे राज्यस्तरीय संमेलन मध्ये पंचवीस प्रयोग पूर्ण झालेले आहेत. त्यांच्या 'रंग माझा वेगळा'  हा कथासंग्रह नुकताच अखिल भारतीय साहित्य महामंडळ अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला. दुसरा कथासंग्रह 'माणसे अशी.. अन्  तशीही...' लवकरच  प्रकाशित होत आहे.




सदर संमेलन रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज ,बॅरिस्टर पी.जी. पाटील सभागृह ,सातारा येथे होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.