*स्नेहालय संचलित 'रेडिओ नगर..' वर्धापन दिनानिमित्त .. यु. के. मधील कलाकार आणि व्हॉइस आर्टिस्ट लॉरेन होजसन यांच्या शुभहस्ते कथालेखन श्री बाळासाहेब देशमुख सन्मानित*

 *स्नेहालय संचलित 'रेडिओ नगर..' वर्धापन दिनानिमित्त .. यु. के. मधील कलाकार आणि व्हॉइस आर्टिस्ट लॉरेन होजसन यांच्या शुभहस्ते कथालेखन श्री बाळासाहेब देशमुख  सन्मानित*



अहिल्यानगर :- स्नेहालय संचलित रेडिओ नगर केंद्राचा १५ वा वर्धापन दिन प्रसिद्ध साहित्यिक माधव मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे प्रकाश पाटील संपादक दै.सकाळ, जॉन कोस्टर माध्यम अँड डॉक्युमेंटरी तज्ञ, गणेश राठोड रिजनल ऑफिसर एमआयडीसी, इत्यादी मान्यवर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी केले. 

या कार्यक्रमात अंतर्गत कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना लॉरेन होजसन, युके मधील कलाकार आणि व्हॉइस आर्टिस्ट यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. 

स्नेहालय संचलित रेडियो नगर एफएम केंद्रावर बाळासाहेब देशमुख यांच्या प्रबोधन, संस्कारक्षम अशा 51 कथा ,'पुस्तकांच्या पानावरून'  या कार्यक्रमांतर्गत प्रसारित झालेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

कथालेखक बाळासाहेब देशमुख यांच्या आजवर अहिल्यानगर आकाशवाणी, बीड आकाशवाणी, रेडिओ नगर एफएम केंद्र, इत्यादी ठिकाणाहून 100 पेक्षा जास्त कथाकथन प्रयोग सादर झालेले आहेत. 

कार्य कार्यक्रम प्रसंगी स्नेहालय प्रमुख डॉक्टर गिरीश कुलकर्णी साहित्यिक सतीश डेरेकर, ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम, ज्येष्ठ लेखक शब्बीर शेख, कलावंत अनंत द्रविड, यांसह अनेक उद्योगपती पत्रकार कलावंत हजर होते. संदीप क्षीरसागर यांनी सूत्र संचालन केले. अंशुमन सब्बन, संजय पारनाईक ,राजीव गुजर, डॉक्टर प्रीती भोंबे, यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी 'यशस्वी होताना माझा प्रवास' या पुस्तकाचे प्रकाशन व 'फिटे अंधाराचे जाळे' या ऑडिओचे लॉन्चिंग मान्यवरांच्या शुभ हस्ते झाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.