विठ्ठल जाधव यांची राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेस निवड
शिरूर कासार
महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जालना येथे झालेल्या छ. संभाजीनगर विभागस्तरीय स्पर्धेमध्ये शिरूर कासार येथील साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांची राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी विभागीय स्पर्धेत ‘तिवढा’ या कथासंग्रहातील ‘पिंजरा’ या कथेचे सादरीकरण जालना येथे शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत वर्ग आठवी ते दहावीच्या गटांसाठी केले. विविध जिल्ह्यांतून सहभागी कथाकारांमधून जाधव यांची कथा अव्वल ठरली असून गडचिरोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवड झाली आहे. तिवढा, बटाटीची धार, रानरांगूळ, आरोळी आणि इतर कथा हे त्यांचे कथासंग्रह असून राज्य साहित्य पुरस्काराने सन्मानित आहेत. या निवडीबद्दल गटशिक्षणाधिकारी प्रशांत शिंदे, उपशिक्षणाधिकारी जमीर शेख, केंद्रप्रमुख निवृत्ती बेदरे, मुख्याध्यापक गोरक्ष खेडकर, अर्जुन बडे यांनी त्यांचे स्वागत केले आहे.


stay connected