जामखेडमध्ये जैन कॉन्फरन्स व कोठारी प्रतिष्ठानचा उपक्रम गतीमान
दत्तात्रेय गोविंद गीते मुक्काम पोस्ट दिघोळ तालुका जामखेड
५०१ वा देहदान संकल्प फॉर्म नोंदवला
जामखेड | दि. ९ डिसेंबर २०२५
जामखेडमध्ये जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन व कोठारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अवयवदान–देहदान–नेत्रदान अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या अभियानातील ५०१वा देहदान संकल्प फॉर्म आज नोंदवला गेला.
दत्तात्रय गोविंद गीते
वय ६७, मुक्काम दिघोळ तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला.शेतकरी कुटुंबातील गीते हे संत निरंकारी मिशन रजिस्टर दिल्ली शाखा दिघोळ तालुका जामखेड संघटनेत कायम समाजसेवा राबवत असतात वृक्षारोपण रक्तदान शिबिरे अनेक कार्य त्यांच्या हातून घडले आहेत आदी उपक्रमातून कार्यरत असलेले दत्तात्रय गीते यांनी आज जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठान कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात हा फॉर्म भरला.
या वेळी बोलताना गिते म्हणाले की, “माणूस मेल्यानंतर राख होण्यापेक्षा देह दुसऱ्यांच्या कामी आला पाहिजे. माझ्या देहापासून अनेक डॉक्टर घडतील आणि लोकांचे प्राण वाचतील, याचे समाधान मला आहे. तसेच माझी सुद्धा प्रेरणा घ्यावी माझ्या घरच्यांच्या संमतीने मी हा संकल्प केला आहे.”
या प्रसंगी युवा उद्योजक अमित गंभीर संत निरंकारी संत मंडळ शाखा जामखेड मुखी म्हणाले की, “सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अपघातग्रस्तांना मदत, डोळे दान व देहदान अभियान, वृक्षारोपण पाणपोया अपघातातील जखमींना मदत असे अनेक कार्य त्यांच्या माध्यमातून राबवले आहे. यांचा संकल्प समाजासाठी प्रेरणादायी आहे.”
*सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य प्रेरणादायी असे अमित गंभीर म्हणाले*
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी माहिती दिली की, “आजवर आम्ही ५०१ लोकांचे देहदान फॉर्म भरून घेतले असून, त्यापैकी २६ जणांचे अवयवदान–डोळे दान पूर्ण झाले आहे. या कार्याला डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, चेअरमन व राज्याचे जलसंधारण मंत्री मा. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, मेडिकल डायरेक्टर डॉ. अभिजीत दिवटे, अधिष्ठाता डॉ. सुनील म्हस्के आणि शरीररचना विभाग प्रमुख डॉ. सुधीर पवार यांचे सहकार्य लाभत आहे.”
या अभियानामुळे जामखेडसह परिसरात “देहदान हीच खरी दानशूरता” हा संदेश प्रभावीपणे पोहोचत असून, अधिकाधिक नागरिक या सामाजिक कार्यात सहभागी होत आहेत.



stay connected