सिंदफणा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अमर हबीब
शिरूर कासारः दि. ९
शिरूर कासार येथे दि. १६ ते १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या सातव्या सिंदफणा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब यांची निवड करण्यात आली. किसानपुत्र आंदोलनाच्या माध्यमातून अमर हबीब यांनी भरीव काम केले असुन साहित्यिक चळवळीत सक्रीय त्यांचा सहभाग आहे.
सिंदफणा नदीच्या काठावर वसलेल्या शिरूर कासार शहरामध्ये एकलव्य विद्यालय येथे होणाऱ्या सातवे सिंदफणा मराठी साहित्य संमेलनात अनेक नामवंत साहित्यिक, विचारवंत, कवी, कथाकार, कलावंत येणार आहेत. ग्रामीण कथाकार भास्कर चंदनशीव साहित्य नगरी असे संमेलन स्थळाला नाव देण्यात आले आहे. परिसरातील शाळा, शिक्षक, शेतकरी यांचा सहभाग मोठ्या संख्येने राहणार आहे.
दरम्यान मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ. राहुल धाकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कथाकार गोरख शेंद्रे यांनी अमर हबीब यांच्या अध्यक्षीय निवडीस अनुमोदन दिले. साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांनी आयोजकांच्या वतीने सुचना मांडली. तसेच अमर हबीब यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मराठवाडा साहित्य परिषद, छ. संभाजीनगरचे सदस्य दगडू लोमटे, प्रा. डॉ. शैलजा बरुरे, सतीश घाडगे तसेच कवी दत्ता वालेकर, पत्रकार गोकुळ पवार, सतीश मुरकुटे यांचेसह साहित्य रसिकजन उपस्थित होते.



stay connected