वेळापुरातील मुलींच्या शाळेला अजिंक्यपद
तालुकास्तरीय लंगडी स्पर्धा : विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी
माळशिरस तालुक्यातील क्रीडा स्पर्धेत वेळापूरच्या मुली शाळेने लहान व मोठ्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावून अजिंक्यपद पटकाविले खेळाडूंना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
यशवंत नगर तालुका माळशिरस येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूर मुली लंगडी लहान गटाने माळशिरस बीट मधील मेडद शाळेस चितपट केले व अंतिम सामन्यात अकलूज बीट मध्ये मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशगाव या संघाला ही पराभवाची धूळ चारून विजेतेपद पटकाविले. लंगडी मोठ्या गटाने दहिगाव बीट मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारुंडे यावर दणदणीत विजय मिळवला व अंतिम लढत माळशिरस बीट मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचरेवाडी या संघासोबत लागली व या संघासही पराभवाची धूळ चारून तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला जिल्हा स्तरावर माळशिरस तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला.
वेळापूर मुली या शाळेने लंगडी खेळामध्ये सलग पाच वर्ष प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या विजयाबद्दल माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, केंद्रप्रमुख बापूसाहेब नाईकनवरे,विठ्ठलराव काळे, बाळासाहेब लावंड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणजित सरवदे मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विजेत्या मुलींना मार्गदर्शक म्हणून नितीन चव्हाण,श्रीम. किरण घाडगे, श्रीम. आसराबाई जैन जीवन रणनवरे प्रवीण कुमार पांगे, सौ कविता आवटे, पांडुरंग कुलकर्णी आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
*लहान गट वेळापूर मुलींचा विजेता संघ*- सुप्रिया तांबोळी, सनम मुजावर, माही माने, तेहजीब बागवान, शिवश्री लोखंडे, साक्षी साठे, अपेक्षा वाघमारे, अन्वयी साबळे, संस्कृती बनसोडे, स्वरा सरवदे,समृद्धी मोहटकर .
*मोठा गट वेळापूर मुलींचा विजेता संघ*- सह्याद्री साठे, सोनाली साठे, साक्षी शेंडगे, त्रिशा इंगोले, अक्षरा साठे, गायत्री जाधव, अल्फिया मुजावर, प्रतीक्षा खिलारे, प्रांजली माने, सिद्धी मगर, साक्षी केंगार, आरुषी जाठोरे



stay connected