जनता चे माजी प्राचार्य गुलाबराव मार्कन्डे सर यांचे निधन
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता वस्तीगृह शिक्षण संस्थेचे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा महेश सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन गुलाबराव आबा मार्कंडे (वय ८२ ) यांचे निधन झाले.माजी आ. भीमराव धोंडे यांचे ते कट्टर समर्थक आणि मार्गदर्शक होते. त्यांचा अंत्यविधी शनिवार दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा. देविनिमगाव येथील वैकुंठधामात होणार आहे.आष्टी तालुक्यातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक,धार्मिक, कृषी क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य होते.आष्टी तालुक्यातील जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे १९७३ ते २०२२ पर्यंत ते प्राचार्य होते.१९७० मध्ये ते बीएड झाले होते.शिवणे येथील विद्यालयात ते १९७१ मध्ये शिक्षक झाले.त्यानंतर १९७२ ते १९७३ मध्ये महालक्ष्मी विद्यालय उंब्रज (जुन्नर) येथे शिक्षक होते.त्यांच्या पाठीमागे पत्नी सौ. जिजाबाई गुलाबराव मार्कंडे, नातू सागर शिवाजी मार्कंडे,नात पूजा शिवाजी मार्कंडे, सून सुरेखा शिवाजी मार्कडे, महेश सहकारी साखर कारखान्याचे आणि राहुरी सहकारी साखर कारखाना सेवानिवृत्त कार्यकारी संचालक हरिभाऊ मार्कंडे हे भाऊ,बहीण पार्वतीबाई अण्णासाहेब इथापे, मुलगी, कुमुदिनी बाळासाहेब पवार, सौ.अपर्णा अजित इथापे, जावई,प्रा.अजित इथापे, पुतण्या डॉ.प्रताप हरिभाऊ मार्कंडे सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. शनिवार दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता देवीनिमगाव येथे अंत्यविधी होणार आहे.


stay connected