सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे ३५ शाळेतील शिक्षिका सौ.प्रतिमा अरुण काळे यांना मानवाधिकार पुरस्कार प्रदान.
पुणे: मानवी हक्क,संरक्षण व जागृती आणि पुणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरण आणि जाधवर लॉ कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानवाधिकार पुरस्कार वितरण सोहळ्यात,सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे ३५ या शाळेतील शिक्षिका सौ.प्रतिमा अरुण काळे यांना "मानवाधिकार पुरस्कार" पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश,जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष मा.महेंद्र महाजन यांच्या अधक्षतेखाली,मा.न्यायाधीश आर.आर देशपांडे सर,मा.न्यायाधीश रेवती देशपांडे मॅडम,लॉ कॉलेजचे उपाध्यक्ष मा.ॲड.शार्दुल जाधवर सर,मा.पोलिस प्राधिकरण,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रामेश्वर जटाळे सर,लेप्टनंट कर्नल मा.शिरीषकुमार सर,मा.डॉ.सुधाकरराव जाधवर सर,मा.कुचेकर सर,मा.अण्णा जोगदंड सर,मा.जोगदंड मॅडम,मा.शंकर नाणेकर सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक,साहित्यिक,सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून हा सन्मान दिल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.याबद्दल निवड समितीचे सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी विशेष आभार मानले.कारण हा निःस्वार्थपणे केलेल्या कार्याचा निःस्वार्थपणे केलेला सन्मान होता.



stay connected