सावधान, बिबट येत आहे?
*आज गावागावात बिबट्या येत आहे. शहरातही आज बिबट्या शिरला आहे व याची झळ नागपूरलाही पोहोचलेली आहे. लोकं अतिशय घाबरलेले असून ते दहशतीत आहेत. ते असा विचार करतात की आता पुरे झाले. एकतर बिबट्याचा बंदोबस्त लावावा किंवा बिबट्याच्या हत्येचे सुत्र आमच्याकडे द्यावे. जेणेकरुन आम्ही बिबट्याचा बंदोबस्त लावू शकू.*
बिबट, त्याला बिबट्या या नावानं ओळखलं जातं. हा जंगली प्राणी आहे व तो मांसभक्षक असल्यानं लोकांना अक्षरशः त्याची भीती वाटत आहे.
बिबट्याच्या अधिवासाबाबत विचार करीत असतांना हा प्राणी कुठेही राहतो, अर्थात झाडावर, पाण्यात, जंगलात आणि आता ती गावातही वास्तव्याला राहतो. त्यातच आता तो शहरातही शिरायला लागलेला आहे.
बिबट्याच्या खाद्याबाबत विचार करतांना त्याचं आवडतं खाद्य आहे, कुत्री, हरीण वा लहान ससे व आपल्या वजनापेक्षा लहान जनावरे. ज्यात लहान मुलांनाही तो क्षती पोहोचवीत असतो. तसं पाहिल्यास तो माणसांना खात नाही. अन् त्याचेपेक्षा मोठ्या असलेल्या जीवालाही तर अजिबात खात नाही. तसं पाहिल्यास भारतातील बिबट्याचं वजन हे वीस किलो असते तर आफ्रिकन बिबट्याचं वजन हे नव्वद किलो असते. भारतामध्ये शिकार करतांना तो रात्री अंधारातच शिकार करतो व शिकार करतांना पुढील भक्ष हा कसा व किती सामर्थ्यवान आहे. याचा अंदाज लावतो व मगच शिकार करतो. तसं पाहिल्यास तो अतिशय विचारी प्राणी नाही. मात्र इतर प्राण्यांच्या तुलनेत त्याची कवटी मोठी असते.
लोकं बिबट्याला घाबरतात. कारण तो अलिकडील काळात माणसांच्या वस्तीत शिरत असून माणसांवरही हल्ले करु लागलेला आहे. त्यातच माणसांची लहान लहान मुलं ही देखील खावू लागलेला आहे. ज्यातून लोकं घाबरतात. त्यातून असं वाटतं की हाच बिबट्या पुढील काळात माणसांनाही खायला मागंपुढं पाहणार नाही. तसा विचार केला तर...... अन् दुसरा विचार करुन त्याला माणसाळविण्याचा विचार केल्यास तोही प्राणी माणसांच्या वस्तीत राहू शकेल. ही शक्यता नाकारता येत नाही. त्यातच हा बिबट माणसांच्या वस्तीत ठेवून त्याला दूध, भात, पोळी दिली तर तो माणसाळविलाही जावू शकतो. ज्यातून त्याची आपणाला असलेली भीती दूर होवू शकते. परंतु ते आपण माणसाळविलेले नसल्याने व ते जंगली असल्याने आज आपल्याला बिबट्याची भीती वाटतेय. मात्र असं त्याला माणसाळविणं सहज शक्य गोष्ट नाही. ती एक अशक्यप्राय गोष्ट आहे.
असेच काही बिबटे नागपूर शहरालगत असलेल्या पारडी क्षेत्रात मुक्कामी आहेत. त्यांनी फार मोठी भीती पसरवलेली असून सध्या लोकं फारच धास्तीत आहेत. त्यातच काही अनैतिक घटक बिबट्या अमूक ठिकाणी दिसला, असे म्हणून भीती पसरवीत असून आता पारडी भागातील रस्तेही रात्री सुनसान झालेले दिसतात. वाटतं की कधी बिबट्या आपल्याला आडवा येईल व कधी आपल्याला क्षती पोहोचवेल.
बिबट्याची ही दहशत पाहता पारडी भागात गर्दीच्या ठिकाणी वसलेल्या इमारतीत शिरलेले दोन बिबटे पकडले. ते रात्रीच परीसरात शिरले असावे असा अंदाज होता. कारण ते दोन्ही बिबटे सकाळी सकाळी लोकांना परीसरात मुक्कामाला असलेले दिसले. त्यातच एका बिबट्यानं भीतीनं लोकांवरच हमला केला होता. ज्यात सात आठ लोकं जखमी झालेले होते. निश्चित आकडा सांगणं कठीण आहे. मात्र बिबट त्याच दिवशी पकडलेला असून तो एक भीतीच नाही तर हास्याचा विषय आणि चर्चेचा विषय ठरलेला आहे. काही लोकं बिबट्याबाबत, 'लांडगा आला रे' सारखं 'बिबट्या आला रे' असं म्हणत विनोद पसरवतात तर काही लोकं बिबट येवू नये म्हणून आतून दाराची कडी लावून बसतात. दारं, खिडक्या बंद करतात. त्यातच एक मुलगी चर्चा करतांना म्हणत होती की बिबट्या हा दरवाजाही ठोकतो माणसासारखा. असं म्हटल्यावर हशा पिकला. परंतु असं जर घडत असेल तर ही बाब विचारात घेण्यालायक बाब असून विचार करायला लावणारी बाब आहे.
बिबट जंगलात राहतो व मांजरीच्या वंशातील प्राणी शोभतो. काही देशात बिबट्याला लहानपणापासूनच पोषतात. तो त्याचा स्वभाव पाहून. त्याला जर कुत्र्यासारखं लहानपणापासूनच घरी पोषलं व खायला प्यायला मांस न देता दूध, भात, पोळी दिलं तर तो त्याच्या अंगात असलेला मूळ स्वभाव विसरुन जावू शकतो. कारण ज्यावेळेस माणसानं कुत्रं पोषणं सुरु केलं. त्यावेळेस तोही जंगलीच प्राणी होता. परंतु आता तो संपुर्णतः गावातच राहात असून माणसाळवलाय. तसंच मांजरीचंही आहे. मांजरीचाही समावेश पुर्वी जंगली प्राण्यातच होत होता. परंतु आता लोकं मांजरीलाही पाळायला लागल्यानं व तिला मांस न देता दूध, भात देत असल्यानं ती आता दूधच पिते व भात खाते. त्यातच पोळीही खाते व ती माणसाच्या घरी राहते. तसं पाहिल्यास काही मांजरी या माणसांवरही हल्ला करतातच. परंतु तरीही आपण मांजर पोषतोच. आज प्रत्येक घरात मांजर व कुत्रा हे एकमेकांचे पक्के शत्रू असतांना बऱ्याच घरात ते एकत्र राहतात. ही वास्तविकता आहे. आज सापासारखे विषारी असणारे प्राणीही काही लोकं पाळतात. त्यातच त्यांचा वापर मनोरंजन म्हणूनच नाही तर पैसे कमविण्यासाठी करतात. काही ठिकाणी सापाची उद्यानेही आहेत. सर्वसामान्य माणूस मात्र सापांना भीतो. कारण त्याचा असलेला स्वभावगुण. जर त्याच्या शेपटीवर पाय पडलाच तर तो चावतो व त्यातून माणूस मरतो. ही आपल्यात असलेली भावना. तरीही जनजागृती होतच असते की साप हा शेतातील उंदरं खातो. किडे खातो. जे किडे वा उंदरं शेतातील पिकांचं नुकसान करतात. आपण हत्तीसारख्या अजस्र प्राण्यांवरही विजय मिळवला व त्याला माणसाळवलंय. तसंच आपण बिबट्या पाळायचा विचार करणं का योग्य नाही? जर त्याच्या पाडसांना लहानपणापासूनच माणसांसारखी वागणूक दिली तर तो आपल्याच शेतातील पीकं नष्ट करणाऱ्या जंगली प्राण्यांपासून अर्थातच रानडुकर वा रानगाईपासून आपल्या पिकांचं नुकसान थांबवेल. कारण बिबट्या हा आपल्यापेक्षा वजनाच्या वरच्या घटकांची शिकार करीत नसला तरी सर्वच प्राणीमात्रा त्याला घाबरतात. परंतु आपण त्याला घाबरतो. कारण आपल्या मनात भीती आहे की तो जंगली प्राणी आहे. तो आपल्याला खाणारच. म्हटलं जातं की अस्तीनचा साप पाळू नये. कारण अस्तीनचा साप हा केव्हा आपला घात करेल. हे सांगता येत नाही. तसं आज आपल्याला बिबट्याबाबत वाटत आहे.
आज बिबट भारतात माणसांच्या वस्तीत शिरलेला आहे. बऱ्याच गावातून बिबट दिसला, बिबट दिसला, अशी आरडाओरड होते. कारण बिबट्याचं माणसाच्या वस्तीत वावरणं. कोणी म्हणत आहेत की वनविभागच बिबट्याला माणसाच्या वस्तीत सोडत असावं. कोणी म्हणत आहेत की भाजपानं अधिवेशनात आंदोलनाला लोकं येवू नये म्हणून बिबट्या आणलाय. परंतु ते लोकांचं म्हणणं आहे. जेवढे व्यक्ती तेवढे विचार. असं म्हणणं बरोबर नाही. कारण बिबट्या व अधिवेशन, याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आणि वनविभागही अशी हरकत करु शकत नाही. मात्र बिबट्याचं मानवी वस्तीत दिसणं, हा संकेत आज असं दाखवत आहे की भविष्यात बिबट्या हा भारतात माणसांच्या वस्तीतच राहील. दूध, भात वा माणसं खात असलेलंच अन्न तोही आनंदानं खाईल. त्यातच काही देशांमध्ये जसे बिबट्याला पोषलं जातं. तसंच भारतातही त्याला पोषलं जाईल.
साधारणतः बिबट्याला सर्व लोकं घाबरतात. त्याचं कारण आहे, आपल्यात असलेला त्याच्याबाबतीतील गैरसमज आणि त्याचं जंगलात राहाणं. तसा तो एक जंगली प्राणीच आहे.
बिबट्या हा शक्यतोवर सहजासहजी आपल्यावर हमला करीत नाही. तसा तो समूहातही हल्ला करीत नाही. तो मार्जार कुळातील प्राणी आहे. कारण बिबट्या म्हणजे काही चिता नाही. चिता वेगळा व बिबट्या वेगळा. बिबट्याच्या शिकारीच्या बाबत विचार केल्यास त्याला शिकार करणे पाहिजे त्याप्रमाणात जमत नाही. परंतु असं असलं तरी आज बिबट नागपूरात वा गाव, शहरालगत दिसणं चिंतेची बाब आहे.
महत्वपुर्ण बाब ही की बिबट्या दिसणं ही सहज प्रवृत्ती आहे. ती नैसर्गिक बाब आहे. परंतु त्याचा बंदोबस्त करणं ही काही नैसर्गिक प्रवृत्ती नाही. बिबट्याचा बंदोबस्त केल्यास तो नक्कीच कमी होवू शकतो. जर सरकारनं बिबट्याची हत्या करण्यासाठी जनतेला खुली सुट दिली तर...... जसं शिवाजी महाराज लहान असतांना व जिजाबाई पुण्याला वास्तव्याला असतांना जे मोकाट लांडगे सुटले होते. लोकं दहशतीत होते. त्यावेळेस त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी माता जिजाबाईनं लांडगे मारण्याची खुली सुट दिली होती. तसेच काही ठिकाणी बक्षीसही ठेवले होते. आज लोकं बिबटच नाही तर त्यांच्यापेक्षा अजस्र प्राण्यांची शिकार करु शकतात. ते माजलेल्या हत्तीलाही काबूत करु शकतात. ते वेळीच बिबट्यांचाही बंदोबस्त लावू शकतात. परंतु ते लाचार आहे त्या नियमापुढं. पुढं एखादा बिबट मारलाच तर त्याच्या हत्येची केस आपल्यावरच लागेल व आपल्यालाच तुरुंगाची हवा खावी लागेल. असाच विचार करुन लोकं बिबट्याच्या वाट्याला जात नाहीत व बिबट्याला मारायला पाहात नाहीत. कदाचीत बिबट्या तर मरुन जाईल. परंतु आपलीच हानी होईल. असं लोकांचं मत.
विशेष सांगायचं झाल्यास बिबट्याचा बंदोबस्त करता येतो आणि तो करायचा असेल तर पहिली बाब बिबट्या मारणे आवश्यक आहे. तसा अध्यादेश सरकारनं काढावा. नाहीतर त्याला माणसाळविण्यासाठी उपाय काढावेत. हत्तीसारख्या प्राण्यांना माणसाळविलं तसं. जेणेकरुन माणसांच्या वस्तीत आलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करता येईल. अन् असं जर झालं नाही तर उद्या तो दिवस दूर नाही की ज्या वेळेस बिबट्याचे गावात व शहरात राज्य निर्माण होईल. त्यातच मानववस्ती नष्ट होईल. ही शक्यता नाकारता येत नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

stay connected