*प्रदिपभाऊ वाघमारे (हाडोळीकर)* यांचा
*भारतीय जनता पार्टी मध्ये अनेक कार्यकर्ते सह प्रवेश*
लोहा:-च़द्रकांत वाघमारे
27 नोव्हेंबर 2025 रोजी लोहा व कंधार नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लोहा येथे मा.श्री.देंवेद्रजी फडणवीस साहेब यांची भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी उपस्थित अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य राज्य खासदार,पंकजाताई मुंडे पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य, आणि चंद्रसेन पाटील सुरनर यांच्या मार्गदर्शनाखाली,मा.श्री.प्रदिपभाऊ वाघमारे हाडोळीकर यांचा प्रवेश केला याप्रसंगी उपस्थित श्री अजित गोपछडे, खासदार राज्यसभा, तुषार राठोड आमदार,राजेश पवार आमदार,जितेश अंतापुरकर आमदार, यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे असंख्य नेते मंडळी उपस्थित होते,
मातंग समाजातील नांदेड जिल्ह्यातील एक धडाडीचे नेतृत्व म्हणून प्रदिपभाऊ वाघमारे हाडोळीकर यांची ओळख आहे,गेल्या 15 वर्षे सामाजिक क्षेत्रामध्ये अंत्यत प्रामाणिकपणे काम त्यांनी केले आहे, आपल्या समाज कार्यातुन त्यांनी एक वेगळीच छप सोडली आहे.नांदेड जिल्हा मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांची मोठी फळी उभी केली आहे.त्यांनी समाजातील अडी अडचणी समाजाचे प्रश्न, समाजाच्या प्रमुख मागण्या यावर खूप मोठ्या प्रमाणावर काम आहे,,
समाजकारणतुन आता राजकारणात प्रवेश करून काहीतरी वेगळ्या प्रकारच्या भुमिका घेऊन योग्य प्रकारे काम करतील अशि भावना समाज बांधवांकडून होत आहे


stay connected