माजी सभापती तथा जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार धोंडीराम बांदल,विठ्ठल बांदल यांना मातृशोक
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती तथा जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार धोंडीराम बांदल,विठ्ठल बांदल यांच्या मातोश्री कावेरीबाई धोंडीराम बांदल यांचे बुधवार काल वृद्धपकाळाने बुधवार दि.२६ नोव्हेंबर रोजी निधन झाले.त्यांचावर धानोरा येथील स्मशानभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कावेरीबाई बांदल या अत्यंत धार्मिक वैचारिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये रमणाऱ्या शांत,सुस्वभावी अशा प्रकारच्या होत्या.त्यांच्या संस्कारातून परिवारातील अनेक सदस्य घडू शकले.सर्वसामान्य कुटुंबियांना त्या मार्गदर्शन करत असत. अनेकांना त्या आधार वाटत होत्या. त्यांच्या संस्कार रुपी सावलीतून अनेकजण मोठे होऊ शकले.त्यांच्या निधनानंतर परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.या अंत्यविधीस माजी आ. साहेबराव दरेकर,ॲड.हनुमंत थोरवे,ए.जी.पवार,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके, माजी सभापती अंकुश चव्हाण, राजाभाऊ शेळके,नामदेव शेळके,सय्यद अब्दुलभाई,अनिल ढोबळे,शिरीषभाऊ थोरवे,ढोबळे एस.एम.कैलास पोकळे,हनुमंत जाधव सर यांच्यासह यावेळी राजकीय, सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक क्षेत्रातील धानोरा पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ,जनता वस्तीग्रह शिक्षण संस्थेतील आजी-माजी प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,कार्यरत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



stay connected