*'रंग माझा वेगळा' .. कथासंग्रहास महात्मा फुले राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित*
अहिल्यानगर:- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे आयोजित, १९ वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, 23 नोव्हेंबर 25 रोजी, पुणे येथे महात्मा फुले सांस्कृतिक भवन मध्ये संपन्न झाले.
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक किशोर टिळेकर तर उद्घाटक डॉ. संजय चोरडिया हे होते. डॉ. शरद गोरे,राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद हे होते.
व्यासपीठावर विशेष अतिथी म. भा. चव्हाण ज्येष्ठ गझलकार, सौ सुवर्ण पवार, श्रीमती शुभांगीताई काळभोर, श्री दत्तात्रेय भोंगळे ,सुनील लोणकर, सूर्यकांत नामुगडे इत्यादी मान्यवर होते.
सदर संमेलन मध्ये अहिल्यानगर येथील कथालेखक श्री बाळासाहेब देशमुख यांच्या पहिला कथासंग्रह 'रंग माझा वेगळा' या ग्रंथास महात्मा फुले राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार, संमेलना अध्यक्ष किशोर टिळेकर, विशेष अतिथी डॉ. शरद गोरे , मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
बाळासाहेब देशमुख यांचे साहित्य, लेखन कट्टा या सदर मध्ये नियमितपणे येत असते. त्यांच्या या कथासंग्रहास सुप्रसिद्ध लेखक सदानंद भणगे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या लेखन साहित्यावर 'माणसे वाचणारा अवलिया' हा मौलीक लेख संपादक श्रीराम जोशी यांनी लिहिलेला आहे.


stay connected