कडा : आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

 कडा : आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव




कडा (ता. आष्टी) येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उच्च शिक्षणात सक्षम परिवर्तन : अध्ययन, अध्यापन आणि प्रशासन” या विषयावर राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेमध्ये राष्ट्रीय खेळाडू श्री बाळासाहेब शेंदुरकर सर यांनी आपला शोधनिबंध प्रभावीपणे सादर केला. त्यांच्या या उल्लेखनीय सादरीकरणाबद्दल त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. प्रा. बापू खैरे सर, मार्गदर्शक प्रा. डॉ. गोपीनाथ बोडके सर, प्रा. डॉ. दत्ता बोडके सर, तसेच श्री असलम शेख सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


शेंदुरकर सरांच्या शोधनिबंधातील विषयवैशिष्ट्ये, त्यांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि उच्च शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्त्व यावर सर्व मान्यवरांनी प्रशंसोद्गार व्यक्त केले.


कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमात भर घालणारी ही राष्ट्रीय परिषद अत्यंत यशस्वी ठरली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.