कंधार तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या मुख्य रस्त्याचे आणि बंदिस्त नालीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे
*कंधार तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या मुख्य रस्त्याचे आणि बंदिस्त नालीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या कामात लाखो रुपयांची अनियमितता व लाखोचा घोटाळा*
रुई येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
कुट्टी कन्स्ट्रक्शन'च्या कामात लाखोंचा घोटाळा
आसा आरोप सामाजिक कार्यकर्ते शरद सोनकांबळे यांनी केले आहे
कंधार :-
चंद्रकांत वाघमारे
निकृष्ट कमा विरोधात शरद सोनकांबळे यांचा
एल्गार..
अधिकारी आणि कंत्राटदारांचे संगनमत असल्याचा मोठा संशय
रुई येथे सुरू असलेल्या मुख्य रस्त्याचे आणि बंदिस्त नालीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या कामात लाखो रुपयांची अनियमितता व घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हे काम कुट्टी कन्स्ट्रक्शन' या कंपनीमार्फत सुरू असून गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या कामाच्या दर्जाकडे संबंधित अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा संशय गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे
काम सुरू होऊनही रस्त्याची दुरवस्था कायम
रुई गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण (CC Road) आणि दोन्ही बाजूंनी बंदिस्त नालीचे बांधकाम गेल्या एक वर्षापासून सुरू आहे
मात्र कामाचा वेग अत्यंत धिम्या आहेच शिवाय वापरण्यात येणारे साहित्य आणि बांधकाम पद्धत पूर्णपणे नियमांचे उल्लंघन करणारी व निकृष्ट दर्जाचे आहे
असा दावा सामाजिक कार्यकर्ते शरद सोनकांबळे यांनी केला आहे
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना गावातील नागरिकांनी सांगितले की"हे काम सुरू झाल्यापासूनच आम्ही वारंवार संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास कामाचा निकृष्ट दर्जा आणून दिला
तरी पण प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांनी या तक्रारींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले
यामुळे स्पष्ट होते की कंत्राटदार "कुट्टी कन्स्ट्रक्शन" आणि संमंधीत अधिकारी यांचे संगनमत आहे आणि ते संगनमताने शासनाची व गावातील जनतेच्या पैशाची लूट करत आहेत
जनतेच्या पैशाची लूट थांबवावी
गावातील अनेक नागरिकांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा रस्त्याच्या कामाची पाहणी केली आणि अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिटच्या गुणवत्तेत तफावत असल्याचे व मोजमाप पुस्तके प्रमाणे झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले
रस्तयाच्या व नालीच्या बांधकामात गजाळीचा अति निकृष्ट दर्जाचे सिमेंटचा वापर केला जात असून ती आताच उकळत असल्याचे दिसून येते आहे
जोपर्यंत या कामाची चौकशी होऊन दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर योग्य ती कारवाई होत नाही,
तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील असा इशारा रूई येथील नागरिकांनी दिला आहे
तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करून या कामाची उच्च स्तरीय तपासणी करावी व शासनाच्या आणि जनतेच्या पैशाची होणारी लूट थांबवावी त्वरित थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद सोनकांबळे यांनी केली आहे


stay connected