*सनातनी,संघी, मनुवादी विचाराने ग्रासलेल्या राकेश किशोर वकील म्हणजे सूर्यावर थुकलेला रंगबदलू सरडा होय-डॉ जितीन वंजारे*
*मुख्य न्यायाधीश बि.आर.गवई यांच्यावर बुटफेक म्हणजे संविधान अन लोकशाही ला गालबोट, सनातण्यांची दलितांप्रति क्रूर मानसिकता उघड, कठोर शासन करा-डॉ जितीन वंजारे*
बीड प्रतिनिधी :- 6 ऑक्टोबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टामध्ये खजुराहो येथील विष्णू मंदिरातील मूर्तीची तोडफोडी ची केस ची सुनावणी होत असताना जातीवादी मानसिकता मनामध्ये ठेवून बुद्धीहीन संघी, जातीयवादी धर्मवादी मनुवादी वकील राकेश किशोर याने मुख्य न्यायाधीश सन्माननीय बी आर गवई साहेब यांच्याकडे बूट फेकून महामहीम चीफ जस्टिस ऑफ इंडिया या पदाचा, संविधानाचा आणि लोकशाहीचा विरोध केल्याचे उघड झाले आहे.गेली चालीस वर्ष वकिली क्षेत्रात काम करणारा ते पण सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करणारा हा राकेश किशोर वकील रिटायरमेंट जवळ आली असताना आपल्या सनातनी जातीवादी, धर्मवादी मनुवादी बुद्धीने ग्रासून भारताच्या मुख्य न्यायाधीशावर बूट फेक करतो त्याच्यामध्ये इतकी हिंमत येथे कुठून? मुख्य न्यायाधीशांना बूट मारणे म्हणजेच एका दलितांचा मुलगा मोठ्या कष्टाने देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला असून सनातन, संघी मनुवादी मानसिकता लक्षात ठेवून जातीवादी धर्मवादी भावनेने ग्रासलेल्या वकिलाला पचनी पडलेला नसून येथील तमाम सनातनी मनवादी भडव्यांचे डोळे ताणलेले दिसताना दिसून येत आहेत कारण मनुवादी मानसिकतेने स्रिय, दलित,पिछडे, मागासवर्गीय यांना कायम खालच्या थरामध्ये ठेवण्याच्या मनसुब्यावर हे कायम आहेत परंतु आज जग बदलत आहे,महामानव, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामध्ये समता, न्याय, स्वातंत्र्य,सार्वभौम एकता आणि बंधुता इत्यादी मूलतत्त्वांमुळे कोणत्याही समाजाचा कसलाही लिंगभेद, जातीयवाद, धर्मवाद न करता दलित असो,आदिवासी असो,कोणत्याही थराचा माणूस केवळ शिक्षणाने उच्च पदस्थ असल्यानंतर तो कायद्यावर बोट ठेवून शिक्षणाच्या पात्रतेने देशाच्या सर्वोच्च पदावर बसू शकतो अशा पद्धतीची समानता या देशांमध्ये शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचाराने प्रस्थापित केलेली आहे. परंतु कायम मड्यायावरचं लोणी खाण्याची सवय लागलेल्या मनुवादी भडव्यांना हे पचनी पडताना दिसत नाही.ज्या देवदैवतांच्या खटल्यांचे निराकरण महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं कायदा आणि संविधान करू शकतो ते स्वतः फुटलेल्या मुर्त्या करूच शकत नाहीत हे उघड झाल्यानंतर हे सर्व मंदिर मज्जित गुरुद्वार बुद्ध विहारी यांचे खटले माननीय कोर्टामध्ये जातात त्या ठिकाणी जुन्या आणि पुरातत्व गोष्टी ह्या पुरातत्व विभागाकडे वर्ग केलेल्या असून माननीय सुप्रीम कोर्टाचा वेळ त्यांनी घेऊ नये असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाचे असताना कोणीतरी राक्षसी प्रवृत्तीचा मनूवादी राकेश किशोर वकील एक पिटीशन दाखल करतो आणि पूर्णाकृती मूर्ती बसवण्याच्या विचारावर ठाम राहतो आणि त्याला पुरातत्व विभागाकडे तुम्ही न्याय मागा अशा पद्धतीची विनवणी केली असता पायातला बूट काढून सी जे आय बी आर गवई साहेबांकडे फिरकावतो याचा सरळ संबंध याची मनवादी बुद्धी दलितांप्रती सर्वोच्च पद गाठल्याची कृरता, ना पसंदी आणि जळकट वृत्ती दर्शवत आहे.
कॉलेजियम नावाच्या प्रक्रियेमधून सुप्रीम कोर्टाची न्यायाधीश निवडले जातात त्यात नातेवाईक, जातीयवाद अन धर्मवाद असतो काही विशिष्ट जातीची मक्तेदारी इथे असताना दिसत आहे महिला जज इथे कमी आहेत,कोणतीही पद भरती करताना त्याची सिनिऑरिटी, त्याचा अनुभव, त्याचं शिक्षण या सर्व गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे परंतु हल्ली कोलेजियम या प्रक्रियेमध्ये जे सरकारला अपेक्षित असणारे जज त्या ठिकाणी नेमले जातात. हे बदलल पाहिजे, सर्वाना समान संधी मिळाली पाहिजे. जज पांचोली सारख्या व्यक्तींचा केवळ विरोधी पक्षातील लोकांना डांबून टाकण्याच्या कायदेशीर कार्यवाहीमुळे सत्ताधारी पक्ष त्यांना मोठमोठ्या पदाच्या ऑफर देत आहेत एव्हाना त्यांना कॉलेजियम द्वारे उच्च पदावर सिलेक्ट केलं जातं काही विशिष्ट उच्च जातीची मक्तेदारी या ठिकाणी चालत असून आज पर्यंतच्या 50 व्या चीफ जस्टीस ची निवड ही उच्च जातीतून झाली होती परंतु ५१ वा चीफ जस्टिस हा दलित असून केवल दलितांनीच उच्च पदस्थ सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च पदग्रहण केल्यामुळे मनुवादी लोकांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली दिसून येत आहे आणि म्हणूनच अशा लोकांवर सर्वोच्च पद असताना सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये स्वतःच्या पायातला बूट मारून एक प्रकारे सर्वोच्च पद संविधान कायदा आणि लोकशाहीचा अपमान करणाऱ्या घाणेरड्या मनुवादी बुद्धीच्या राकेश कुमार या वकिलाला देशद्रोही ठरवून फाशीची शिक्षा द्यावी असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे. या घाणेरड्या वकिलाला पोलीस पकडतात त्याला चहापाणी करतात आणि त्याच्यावरती एफ आय आर दाखल न करताच त्याला घरी पाठवतात येथील इतर जज त्यावरती गुन्हा नोंदवण्यास नकार देतात किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया बी आर गवई साहेब यांनीही कोणत्या दबावाखाली त्याला सुट्टी दिली त्यावर गुन्हा का नोंद केला नाही याचीही चौकशी होणे अपेक्षित आहे. कारण मनुवादी विचाराच्या घाणेरड्या लोकांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे अशी देशद्रोही लोक पकडून जेलमध्ये डांबून टाकली पाहिजेत. हा मनुवादी राकेश किशोर वकील मीडियासमोर येतो आणि सांगतो की 'सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान',मी केलेल्या कोणत्याच गोष्टीचा मला पछतावा नाही, मी घाबरलेलो नाही किंवा भीत नाही, मला पोलिसांनी सन्मानपूर्वक वागणूक देऊन उलट चहापाणी करून घरी पाठवले, मी कोणत्याही नशेत हे केल नाही यावरून स्पष्ट होत आहे की येथील मनोवादी लोक यांच्या पाठीशी आहेत हा फक्त मोहरा असून ही कृती येथील सत्ताधारी लोकांकडून स्पॉन्सर्ट आहे हे स्पष्ट होत आहे. भारतीय संविधानाच्या कलम 49 नुसार पुरातत्व खात्याकडून अशा जुन्या गोष्टीचे जतन करणे, सर्वांनी स्वतःची संस्कृती जतन करणे, धर्माचा वारसा जपणे किंवा स्वतःची बोलीभाषा परंपरा धर्म वाढवणे जपवणे हे स्वतंत्र आहे. या गोष्टी लक्षात घेऊन पुरातत्व विभाग दि अँसीएन्ट मोनूमेंट ऍक्ट 1958 च्या कायद्यानुसार सर्व जुने मोनुमेंट्स जपणे,पौराणिक वास्तू,मंदिरे मुर्त्या, जुने ऐतिहासिक गोष्टी चे जतन करणे त्यांचा वारसा जपणे हे सर्वस्वी पुरातत्व खात्याची जबाबदारी असून असे निकाल माननीय सुप्रीम कोर्टात घेऊन न येण्याचे आदेश असतानाही अशा पिटीशन दाखल करून समाजामध्ये तेढ निर्माण करणारे राकेश किशोर सारखे नालायक वकील भारत देशामध्ये आहेत, स्वतः राकेश कुमार म्हणतो की मी गोल्ड मेडलिस्ट आहे, मी कुठल्याही प्रकारचे व्यसन केलेलं नाही, मी शुद्धीत असताना सी जे आय गवई यांनी दिलेल्या स्टेटमेंट वर रिएक्शन म्हणून हे केल आहे. माझ्या परमात्मा ने हे माझ्याकडून करून घेतलेला आहे.मी कुठलीही वाईट गोष्ट केलेली नाही. मी जे केल आहे त्यावर मला अभिमान वाटतो आहे, असं उघडपणे चीफ जस्टीस ऑफ इंडिया यांच्यावर बूट फेकूनही एखादा सनातनी करत असेल आणि चीफ जस्टीस ऑफ इंडिया बी आर गवई साहेब त्यावर कार्यवाही न करता गप्प बसले याचा अर्थ त्यांना कुणाचा तरी दबाव असावा आणि यातून एक मेसेज जाईल की दलित,आदिवासी आणि मागासवर्गीय समाजातील कुठलाही व्यक्ती जरी तो देशाच्या सर्वोच्च पदावर असला तरी त्याची लायकी उच्च जातीच्यांची बूट खाणे इतकीच आहे असा समाजामध्ये मेसेज जाईल. त्यामुळे एक सामाजिक भान असलेला सामाजिक कार्यकर्ताव दलित नेता या नात्याने मी डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर आव्हाहन करतो की हा बूट फेकणारा वकील राकेश किशोर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगवास घडवा. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.


stay connected