.मंत्री.बाळासाहेब थोरात,पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांच्या उपस्थित होणार जे.आर पवार साहेबांचा सेवानिवृत्ती सोहळा, मोठ्या संख्येने उपस्थित रहा-प्रदिप थोरवे

 मा.मंत्री.बाळासाहेब थोरात,पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांच्या उपस्थित होणार जे.आर पवार साहेबांचा सेवानिवृत्ती सोहळा, मोठ्या संख्येने उपस्थित रहा-प्रदिप थोरवे 




सहकार,शिक्षण,राजकारण,समाजकारनातील दांडगा अभ्यास,कामावरील निष्ठा,आरोग्यदूत,दानशूर म्हणून ओळखले जाणारे सामाजिक बांधिलकी हेच ब्रीद जपणारे मा.श्री.जे आर पवार साहेब, शासकीय तलाठीची नोकरी सोडून सुरवातीला कडा कारखाना आणि नंतर त्यांनी 38 वर्ष श्री.वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे मैनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले.व दादा पाटील राजळे महाविद्यालय ची संचालक पदाची धुरा देखील सांभाळली.

एकूण ४८ वर्ष सेवा करून वृध्देश्वर सहकारी साखर कारखाना ली. येथून मैनेजिंग डायरेक्टर पदावरून ते निवृत्त होत आहेत.त्यांचा सेवापूर्ती सोहळा 

मा.मंत्री.बाळासाहेब थोरात साहेब ,मा.पद्मश्री.पोपटराव पवार साहेब(हिवरेबाजार),मा.खा.बजरंग बप्पा सोनवणे,मा आ.मोनिकाताई राजळे,

मा.आ.सुरेश(आण्णा)धस,मा.आ भीमराव धोंडे साहेब,मा.आ.साहेबराव (नाना) दरेकर,मा.आ बाळासाहेब (काका)आजबे ,डॉ.एस बी निमसे साहेब (कुलगुरू) आणि बीड व अहिल्यानगर जिल्ह्यातील साहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या गावी पांडुरंग मंगल कार्यालय,पिंपळा ता-आष्टी,जि.बीड येथे दिनांक २४/१०/२०२५ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे,तरी आपण सर्वानी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे अशी  विनंती पवार साहेबांचे भाचे प्रदिप थोरवे यांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.