अमोलक संस्थेमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

 *अमोलक संस्थेमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न*




कडा: येथिल गांधी महाविद्यालयामध्ये श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा, तालुका विधी सेवा समिती आष्टी व विधीज्ञ संघ आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते श्री अमोलक ऋषिजी म. सा. व सरस्वती देवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आष्टी न्यायालयाचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश श्री. के. के. खोमणे, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी. जी. इनामदार मॅडम, दुसरे सह दिवानी न्यायाधीश श्री. एम. आर. बडाख, आष्टी पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री. एस. डी. शिंदे, आष्टी वकील संघाचे अध्यक्ष श्री. अजय जेवे, जेष्ठ विधीज्ञ ॲड. बाबुराव अनारसे, ॲड. निंबाळकर व वकील संघाचे  कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडाचे विश्वस्त अध्यक्ष श्री. गोकुळदास मेहेर हे होते. तसेच व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त उपाध्यक्ष श्री. बाबुलाल भंडारी, संस्थेचे प्रधानमंत्री श्री. हेमंतकुमार पोखरणा, मानदमंत्री डॉ. महेंद्रकुमार पटवा, कोषाध्यक्ष डॉ. उमेशकुमार गांधी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अजय जोशी यांनी करत असताना बालक संरक्षणविषयक कायद्याची माहिती दिली, संस्थेचे विश्वस्त उपाध्यक्ष श्री. बाबुलाल भंडारी यांनी अमोलक संस्थेविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये कायदेविषयक ज्ञान जाणून घेण्याची आवश्यकता विशद केली. आष्टी पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री. एस. डी. शिंदे यांनी सायबर क्राईम व मोबाईल वापरताना विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. सह दिवाणी न्यायाधीश श्री. एम. आर. बडाख यांनी महिलाविषयक कायद्याविषयी मार्गदर्शन करताना विशाखा मार्गदर्शक तत्वे याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. न्यायमूर्ती श्रीमती पी. जी. इनामदार मॅडम यांनी मानसिक आरोग्याबद्दल विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी व याविषयी असणारे संरक्षक कायदे याची माहिती दिली. 

दिवाणी न्यायाधीश श्री. के. के. खोमणे यांनी विविध कायदेविषयक मार्गदर्शन करताना अमली पदार्थांचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम याविषयी कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकला.

संस्थेचे मानदमंत्री डॉ. महेंद्रकुमार पटवा यांनी समारोप करताना महाविद्यालयीन जीवनात युवकांसमोर असणारे आवाहने स्पष्ट केले तसेच विद्यार्थिनींनी शिक्षण घेत असताना निडर होऊन आव्हानांना सामोरे जाणे व कायदेविषयक माहिती संपादन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते गांधी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच चंदनमल भळगट प्राथमिक विभागातील मंथन परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. शतक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या अमोलक संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक कार्याची प्रमुख दिवाणी न्यायाधीश श्री. के. के. खोमणे व इतर मान्यवरांनी दखल घेऊन समाधान व्यक्त केले. याप्रसंगी गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. नवनाथ पडोळे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गफार सय्यद, गुंदेचा मॅडम, मोतीलाल कोठारी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मथाजी शिकारे , प्रा. धनंजय कोकणे व प्रा. अजीत गुगळे पत्रकार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. श्री. शेख यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.