*कवी आनंद घायवट अद्वैत मीडिया सिंधुदुर्ग आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट.*
आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवून अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या 'अद्वैत दिवाळी अंक' आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत कसारा मिलिंद नगर येथील कवी श्री. आनंदजी घायवट ह्यांना 'ऋतू चक्राच्या बहरात' ह्या कवितेसाठी राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे.
'आपला सिंधुदुर्ग' डिजिटल चॅनेलच्या अद्वैत दिवाळी अंकाचे यंदाचे तिसरे वर्ष असून वेगळ्या धाटणीचे विषय, कथा कविता व लेख निवडताना कार्यकारी संपादक सरिता पवार ह्यांच्या चोखंदळपणामुळे संग्रही ठेवण्याजोगा परिपूर्ण दिवाळी अंक म्हणून अंकाने नावलौकिक मिळवला असून अल्पावधीतच अद्वैत दिवाळी अंकाने साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकचा अतिशय मानाचा 'विशाखा पुरस्कार' प्राप्त वाशिम येथील नामांकित 'साहित्यिक मोहन शिरसाट' ह्यांनी महाराष्ट्र भरातून आलेल्या कवितांमधून 'महिलांना भेडसावणाऱ्या विषयावर संवेदनशीलपणे केलेल्या काव्यलेखनामुळे' आनंदजी ह्यांच्या कवितेची निवड केली.
सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच भव्य अश्या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे मुख्य संपादक राजनजी चव्हाण ह्यांनी सांगितले आहे.


stay connected