आवाटी येथील वली बाबा दर्गा येथे जश्ने गौसे आजम च्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन, दर्गाह ट्रस्टने केले लाभ घेण्याचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील आवाटी येथील वली बाबा दर्गा मध्ये दिनांक 10 ऑक्टोंबर शुक्रवार 2025 उर्दू तारीख 17 ग्यारहवी शरीफ जुमा १४४७ हिजरी रोजी जस्ने गौसे आजम च्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी यांनी माहिती दिली
याबाबत अधिक माहिती देताना श्री तांबोळी पुढे बोलताना म्हणाले की प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी आवाटीज्ञ येथील वलि बाबा दर्गाह मध्ये जसने गौसे आजम चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांमध्ये दिवसभर तोशे की नियाज चा जीयारते मुए मुबारक, तसेच गिलाफे मुबारक चा कार्यक्रम असतो सदरचा धार्मिक कार्यक्रम सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत चालू राहतो सदर जियारते मुए मुबारक च्या दर्शनासाठी अनेक भक्तजन हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात सदर कार्यक्रमासाठी राज्यातून तसेच परराज्यातून अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवितात सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्गाह परिसरात विविध रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे याशिवाय आलेल्या भक्तगणांना राहण्याची व्यवस्था तसेच पार्किंगची व्यवस्था देखील उत्तमपणे दर्गा ट्रस्टने केली आहे सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवसभर आलेल्या भक्तगणांना लंगरखाना चे आयोजन करण्यात आले आहे
सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वली बाबा दर्गाचे खादीम गुलाम नबी कादरी तसेच इरफान कादरी व हसनैन कादरी तसेच दरगाह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तसेच आवाटी ग्रामस्थ यांनी केले आहे


stay connected