महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात शिक्षक दिन साजरा...
लोहगाव (वार्ताहर): रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय, कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विनायक मेथवडे हे होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत साई वाईकर याने केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तनुजा भालेराव, ज्ञानेश्वरी शेळके, सिद्धी खर्डे, शरयू खर्डीकर, डॉ. शरद दुधाट, उपप्राचार्य अलका आहेर, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी देवेश आहेर, प्रतिभा ठोकळ आदींसह शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा चेचरे व गायत्री थेटे यांनी केले तर आभार अनंत दातीर याने आभार मानले. कन्या विद्यालयात मुख्याध्यापिका नलिनी जाधव यांच्या हस्ते अध्यक्षतेखाली शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन संगीता उगले यांनी केले. यावेळी माधुरी वडघुले,प्रफुल्ल नव्हाळे,सुजाता ठाकरे, कमल थिटे, मीनाक्षी गांगुर्डे, दिपाली आंबेकर, शैलजा सातपुते,विलास गभाले,प्रमिला पंडोरे, सुवर्णा भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. मुले विभागाकडे मुख्याध्यापक विनायक मेथवडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेणुका वर्पे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी संजय ठाकरे, नरेंद्र ठाकरे यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected